सूप नव्हे, पूर्णान्न! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सूप नव्हे, पूर्णान्न!
सूप नव्हे, पूर्णान्न!

सूप नव्हे, पूर्णान्न!

sakal_logo
By

खवय्येगिरी

सूप नव्हे, पूर्णान्न!

उत्तम मेजवानीच्या मेन्यूला स्टार्टर्सशिवाय पूर्णता नाही. स्टार्टर्सने पोट भरत नाही हे खरं; पण त्याच्याशिवाय पुढच्या मेजवानीला चवही येत नाही. म्हणून स्टार्टर्स हे रुची वाढविणारे, पोट भरू न देता स्वादाला पूर्णत्ता देणारे आणि मेजवानीला पूर्णत्व देणारे पोषणमूल्य आहे. आपणबाहेर गेलो की, सूप मागवितो; पण खरं तर सूप म्हटलं की, ते संपूर्ण अन्न आहे. कारण या सुपात शरीराला आवश्यक ते अन्नघटक असतात. म्हणूनच आजारपणात डॉक्टर पेशंटना सूप देण्याचा सल्ला देतात.
- सतीश पाटणकर, मुंबई sypatankar@gmail.com
...................
आजकाल विविध रेस्टॉरंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची सूप सर्व्ह केली जातात. जेवणाच्या अगोदर सूप असते. अगदी लहानांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनाच सूप हा प्रकार आवडतो. ब्रेकफास्ट राजासारखा घ्यावा, दुपारचे जेवण राजकुमारासारखे आणि रात्रीचे जेवण एखाद्या भिकाऱ्यासारखे, अशा आशयाची इंग्रजीत एक म्हण आहे. कसे खावे नि किती खावे, याचे मार्गदर्शन करणारी ही म्हण कायम लक्षात ठेवण्यासारखी आहे. हिरवे अन्न अधिक खावे, म्हणजे अर्थातच पालेभाज्या, भाज्या, कडधान्य. आपल्या पूर्वजांनी खाण्याकडे केवळ ''पोट भरणे'' म्हणून कधीही पाहिलेले नाही. खाणे हा त्यांच्यासाठी एक संस्कार होता. त्यांचे खाणे त्यांच्या प्रकृतीमानाला आणि ऋतुमानाला साजेसे होते.
''उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म''. आजकाल टाईमपास म्हणून, मजा म्हणून पिझ्झा, बर्गर, वेफर्स खाणाऱ्या पिढीला हे कदाचित कळणार नाही. ज्या माणसाची शारीरिक किंवा मानसिक ॲक्टीव्हिटी अधिक असते, त्याची खाण्याची गरज अधिक असते. ही ॲक्टीव्हीटी जेव्हा सुरू असते, त्यावेळी ती जास्त असते; परंतु आपल्याकडे नेमके उलटे होते. जेव्हा भरपूर काम असते, तेव्हा लोक खात नाहीत आणि काम संपते, उसंत मिळते, तेव्हा भरपेट खाल्लं जातं. अशाप्रकारे गरजेनुसार न खाणे आणि वेळेवर न खाणे यामुळे वजन वाढते, असे डॉक्टरांचे म्हणणे असते.
दिवसाच्या कोणत्याही प्रहरी तुम्ही खाल्लात, तरी ते अन्न ताजे हवे. ताज्या अन्नातले घटक लवकर शोषले जातात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, खाल्यावर उत्साह वाटला पाहिजे. आपली भूक वेगवेगळी असते. दिवसातला जेवढा वेळ आपण जागे असतो, त्यावेळेत दोन-दोन तासांनी खाल्ले तर उत्तम. उत्तम मेजवानीच्या मेन्यूला स्टार्टर्सशिवाय पूर्णता नाही. स्टार्टर्सने पोट भरत नाही हे खरे; पण त्याच्याशिवाय पुढच्या मेजवानीला चवही येत नाही. म्हणून स्टार्टर्स हे रुची वाढविणारे, पोट भरू न देता स्वादाला पूर्णत्ता देणारे आणि मेजवानीला पूर्णत्व देणारे पोषणमूल्य आहे.
आपणबाहेर गेलो की, सूप मागवितो; पण खरे तर सूप म्हटले की, ते संपूर्ण अन्न आहे. कारण या सूपात शरीराला आवश्यक ते अन्नघटक असतात. म्हणूनच आजारपणात डॉक्टर पेशंटना सूप देण्याचा सल्ला देतात. आजकाल विविध रेस्टॉरंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारची सूप सर्व्ह केली जातात. बहुतेक लग्न समारंभात किंवा साध्या घरगुती सोहळ्यात स्टार्टर्स सर्व्ह केले जातात. जेवणाच्या अगोदर सूप असते. अगदी लहानांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनाच सूप हा प्रकार आवडतो. चायनीज सूपला सर्वसामान्य माणसाची पसंती असते. मंच्याव, मंम्युरीयन, ''हॉटन् सोर'' अशा प्रकारची किंवा नेहमीच सर्व्ह केले जाणार टोमॅटो सूप असतेच असते. शाकाहारी आणि ताज्या भाज्यांची किंवा फळभाजांची सूप शरीराला सर्व प्रकारची पौष्टिक मूल्ये मिळवून देतात. पालक सूप, टोमॅटो सूप, मिक्स व्हेज सूप, बीट सूप, गाजर-सफरचंद सूप, हिरव्या वाटाण्याचे सूप, कोरिअंडर लेमन सूप, चवळीच्या देठाचे सूप, गाजराचे क्रीम सूप, मशरुम सूप, लाल ढबू मिरचीचे सूप, स्वीट कॉर्न सूप, बार्ली-मूग सूप त्याचबरोबर चिकन किंवा फिशमध्येही वेगवेगळ्या स्वादाची सूप बनविली जातात. कोणत्याही प्रकारचे सूप बनवायचे असेल, तर त्यात वापरला जाणारा घटक हा फ्रेश हवा, हे ध्यानात घेतले पाहिजे. आज आपण कोणत्याही हॉटेलात जा, तिथल्या मेनू कार्डवर आपल्याला सूपची असंख्य नावे दिसतील. सूप हा जेवणापूर्वीचा आनंद देणारा खाद्य प्रकार आहे, एवढे मात्र निश्चित.

असे बनवा सूपः
लेमन कोरी एन्डर सूप - आपण कधी थाई रेस्टॉरंटमध्ये गेला, तर आपल्याला त्याठिकाणी Tom Yum सूप मिळते. त्या सूपमध्ये लेमनग्रास, काफीर लाईमचे पान, गलंगल आदीचा स्वाद जाणवतो. या सूपशी जवळचे असे लेमन कोरीएन्डर सूप आहे. हे सूप बनविण्यासाठी एक जुडी कोथिंबीरीचे देठ, 3-4 इंच लांबीचे गवती चहाचे दांडे (एकूण दोन), अर्धा इंच आले, एक मोठा टोमॅटो, अर्धा लिंबू, चवीप्रमाणे मीठ, साखर, मीरपूड आणि तीन कप पाणी एवढे साहित्य लागते.
गवती चहाचे दांडे धूवून बत्याने थोडे ठेचून घ्यावेत. आले धुवून त्याच्या चकत्या कराव्यात. टोमॅटो बारीक कापून घ्यावा. एका पातेल्यात पाणी घेऊन तापायला ठेवावे. पाणी तापत आले की, त्यात धुतलेले कोथिंबीरीचे दांडे, आले, गवती चहा, टोमॅटो घालावेत. गॅस मध्यम करून व्यवस्थित उकळू द्या. तीन कप उकळून साधारण पाच कप होईल, इतपत उकळावे. पातेले गॅसवरून ते पाणी गाळून घ्यावे. गाळलेले पाणी परत एका पातेल्यात घालून गॅसवर गरम करावे. त्यात चवीप्रमाणे मीठ, साखर आणि मिरीपूड घालावी. भांडे खाली उतरताना त्यात लिंबू पिळावे आणि सर्व्ह करावे. सहज मिळत असेल, तर गलंगल हे थाई आले साध्या आल्याऐवजी वापरावे. सूप बनविताना त्यात गाजराच्या आणि फ्लॉवरच्या फोडी टाकाव्यात. त्यामुळे सूप अधिक चविष्ट होते.

पालक सूप - पालक सूप बनविण्यासाठी दोन पालकाच्या जुड्या, एक वाटी वाफवलेले मटारचे दाणे, मैदा, मीठ, मीरपूड, एक चमचा लोणी, एक कप दूध, दोन लवंग, एक तमाल पत्र एवढे साहित्य लागते. पालकाची पाने धुवून पाण्यात शिजवा. नंतर गार झाल्यावर मिक्सरमधून काढून मिश्रण गाळून घ्या. लोणी, मैदा व दूध यांचा सॉस करून घ्या. पालकाचा रस, मटारचे दाणे, सॉस एकत्र करा. त्यात लवंग व तमालपत्र टाकून उकळा. मीठ, मीरपूड घालून गरमागरम सर्व्ह करा.

हॉट ॲण्ड सॉर सूप - हे सूप शाकाहारी व मांसाहारी मिळते. शाकाहारी सूप बनविताना चिकन ऐवजी ताज्या भाज्यांचा स्टॉक वापरावा. गाजर, सिमला मिरची, कोबी, हिरवी मिरची, आले, लसूण, पाती कांदा बारीक चिरून घ्यावा. हे सूप बनविण्यासाठी दोन चमचे सोया सॉस, 2 चमचे ग्रीन चिली सॉस, 2 चमचे कॉर्न फ्लॉवर पेस्ट, चवीपुरते मीठ, मीरपूड एवढे साहित्य लागते.
एका मोठ्या भांड्यात तेलावर हिरवी मिरची, आले, लसूण परतवून घ्या. त्यात दोन चमचे सोया सॉस आणि स्टफ भाज्या (बारीक चिरलेल्या) मोठ्या आचेवर परतवून घ्या. सूपला एक ऊकळी आली की, मग कॉर्नफ्लॉवरची पेस्ट हळूहळू टाकावी. एकदम टाकू नये. कॉर्नफ्लॉवरच्या गुठळ्या होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. मग त्यात चिली सॉस व मीरपूड टाकावी. कॉर्नफ्लॉवरची पेस्ट टाकल्यावर सूपची घनता लगेच वाढते. ज्यांना अंडे आवडते, त्यांनी सूप उकळत असताना, म्हणजे एक उकळी आल्यावर त्यात फेटलेले अंडे चमच्याने थोडेथोडे टाकावे. एकदम टाकू नये. वाटल्यास चहा गाळणीचा वापर करावा.
स्टफ भाज्याऐवजी उकडलेल्या बोनलेस चिकन वापरल्यास ''चिकन हॉट ॲण्ड सोर'' सूप तयार होईल. यात उकडून तेलात तळलेले नुडल्स टाकावेत. हे सूप गरमागरम खाण्यात मजा असते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73726 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top