स्टेपिंग स्टोन स्कूलतर्फे कुणकेरीत वृक्षारोपण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्टेपिंग स्टोन स्कूलतर्फे कुणकेरीत वृक्षारोपण
स्टेपिंग स्टोन स्कूलतर्फे कुणकेरीत वृक्षारोपण

स्टेपिंग स्टोन स्कूलतर्फे कुणकेरीत वृक्षारोपण

sakal_logo
By

33362
सावंतवाडी ः वृक्षारोपण कार्यक्रमास सहभागी स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे विद्यार्थी.

स्टेपिंग स्टोन स्कूलतर्फे
कुणकेरीत वृक्षारोपण
सावंतवाडी, ता. ३ ः कोलगाव येथील स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या मुलांनी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने कुणकेरी येथील वनविभागाच्या जमिनीत विविध प्रकारच्या फळझाडांचे वृक्षारोपण केले. यावेळी सहभागी मुलांना जंगलाची माहिती आणि जैव विविधता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या सर्व मुलांना विविध अॅक्टीव्हिटीज शिकविल्या जातात. यातीलच एक भाग म्हणून वृक्षारोपण आणि जंगल याचे महत्त्व मुलांना कळावे, यासाठी वनविभागाच्या मदतीने कुणकेरी येथील जंगलामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी माजगाव वनपाल प्रमोद सावंत, स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे रुजल पाटणकर, सौ. कश्मिरा पाटणकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये सहभागी चौथी आणि पहिलीच्या मुलांनी वृक्षारोपण केले. तर दुसरीच्या मुलांना सेंद्रिय खत निर्मितीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तिसरीच्या मुलांनी पर्यावरण संवर्धनाबाबत प्रात्यक्षिक सादर केले. या कार्यक्रमाने सहभागी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73728 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top