
तळेरे हायस्कूलमध्ये कृषिदिन उत्साहात
L33359
तळेरे ः येथील हायस्कूलमध्ये फळरोपांची लागवड करून कृषिदिन साजरा करण्यात आला.
(छायाचित्र ः एन. पावसकर)
तळेरे हायस्कूलमध्ये
कृषिदिन उत्साहात
तळेरे ः येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात विविध फळरोपांची लागवड करून कृषिदिन साजरा करण्यात आला. शाळा समिती सदस्य शरद वायंगणकर यांच्या हस्ते वृक्षारोपणाची सुरवात करण्यात आली. यावेळी माजी मुख्याध्यापक एस. जी. नलगे, मुख्याध्यापक अविनाश मांजरेकर, सी. व्ही. काटे, एन. बी. तडवी, एन. गावठे, ए. पी. कोकरे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कृषिदिनानिमित्त पाचवी ते बारावीमधील विद्यार्थ्यांनी आणलेल्या आंबा, काजू, चिकू, पेरू, सीताफळ यांसारख्या फळरोपांची विद्यालयाच्या परिसरात यावेळी लागवड करण्यात आली. विद्यालयाचे मुख्याध्यापक अविनाश मांजरेकर यांनी कृषिदिनाचे महत्त्व सांगितले. शाळा समिती सदस्य शरद वायंगणकर यांनी शेतकऱ्यांना भातशेतीमध्ये एक दिवस मदत करून कृषिदिन साजरा करण्याचे आवाहन सर्वांना केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73736 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..