चिपळूण-अभियांत्रिकी महाविद्यालयात पर्यावरण सप्ताह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-अभियांत्रिकी महाविद्यालयात पर्यावरण सप्ताह
चिपळूण-अभियांत्रिकी महाविद्यालयात पर्यावरण सप्ताह

चिपळूण-अभियांत्रिकी महाविद्यालयात पर्यावरण सप्ताह

sakal_logo
By

rat3p17.jpg
ःL33411
वेळणेश्वर ः समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करताना महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी.
----------
अभियांत्रिकी महाविद्यालयात पर्यावरण सप्ताह

गुहागर, ता. ४ ः महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय वेळणेश्वरमधील राष्ट्रीय सेवायोजना विभागातर्फे पर्यावरण व स्वच्छता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात पर्यावरण, वृक्षलागवड आदी विषयांवर व्याख्याने तसेच प्रत्यक्ष वृक्षारोपण व स्वच्छता करण्यात आले. पर्यावरण व स्वच्छता सप्ताहाचे उद्‌घाटन ग्रुप ग्रामपंचायत वेळणेश्वर वाडदई गावचे सरपंच चैतन्य धोपावकर यांनी वृक्षारोपणाने केले. या वेळी प्रा. केतन कुंडिया यांनी पर्यावरणविषयी जनजागृतीची आवश्यकता का आहे, या विषयी मार्गदर्शन केले. सप्ताहामध्ये महाविद्यालय परिसर, वेळणेश्वरचे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेळणेश्वर नं. १, वेळणेश्वर मंदिर व समुद्रकिनारा यांची स्वच्छता करण्यात आली. पर्यावरण जनजागृती रॅली काढण्यात आली.
समारोपाच्या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजना विभागाने केलेल्या श्रमदानाबद्दल सरपंच चैतन्य धोपावकर यांनी अभिनंदन केले. प्रा. डॉ. अमितकुमार माने यांनी पर्यावरण जनजागृती व स्वच्छता या विषयी मनोगत व्यक्त केले. या वेळी प्राचार्य अविनाश पवार, प्रा. अरुण सरगर, प्रा. केशव चौगुले, प्रा. निखिल पांढरपट्टे, औदुंबर पाटकर, श्रुती मुंडे, वैभवी मेथा व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.
-----------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73765 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top