रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा
रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा

रत्नागिरी- संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

क्षत्रिय मराठा मंडळातर्फे
गुणवंतांचा सत्कार होणार
रत्नागिरी : क्षत्रिय मराठा मंडळातर्फे रत्नागिरीतील मराठा समाजातील दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. १० जुलैला सायंकाळी ५ वाजता माळनाका येथील हॉटेल विवेक येथे कार्यक्रम होणार आहे. फेब्रवारी- मार्च २०२२ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेला ८५ टक्के अथवा अधिक गुण तसेच बारावीच्या परीक्षेमध्ये ८० टक्के अथवा अधिक गुण (गुणपत्रिकेवरील टक्केवारीप्रमाणे) मिळाले आहेत, अशा रत्नागिरी तालुक्यातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. अशा विद्यार्थ्यांनी त्यांच्या गुणपत्रिकेची सत्यप्रत आणि आधारकार्डची सत्यप्रत ६ जुलैपर्यंत दुपारी १.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत (सोमवार व शासकीय सुट्या सोडून) क्षत्रिय मराठा मंडळाच्या बेसमेंट स्टोअर क्र. ३, बी विंग, सिद्धिविनायक रेसिडेन्सी, मजगाव रोड, रत्नागिरी येथे आणून द्यावी.
--------
कालिदास दिन साजरा
रत्नागिरी : पटवर्धन हायस्कूलमध्ये संस्कृत विभागातर्फे कालिदास दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रशालेचे मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे, प्रमुख अतिथी ॲड. आशिष आठवले, संस्कृत शिक्षक, इयत्ता आठवी व नववीचे विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक संस्कृत विभागप्रमुख जयेश गुरव यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सुनीता गाडगीळ यांनी करून दिला. या वेळी निर्जला तेरवणकर, ऋग्वेद फडके, विश्वरी पवार, वेदांग कुळापकर या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख अतिथी ॲड. आठवले यांनी कवी कुलगुरु कालिदासाची माहिती गोष्टीरूपात सांगितली. मिहीर पंगेरकर याने सूत्रसंचालन तर प्रिती केळकर यांनी आभार मानले.
--------
स्वरूपानंद पतसंस्थेत
आंतरराष्ट्रीय सहकार दिन
रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेत आंतरराष्ट्रीय सहकार दिन शनिवारी (ता. २) साजरा झाला. या प्रसंगी ग्राहकांनी संस्थेमध्ये एक कोटी दोन लाखाच्या ठेवी जमा करून दणदणीत पद्धतीने साजरा केला. सहकाराचे, समानतेचे, परस्पर सहयोगाचे तत्व प्रवाही राहावे. सहकाराची महती प्रवाही राहावी. यासाठी जगभरामध्ये २ जुलै हा सहकार दिन म्हणून साजरा केला जातो. त्याला अनुलक्षून स्वरूपानंद पतसंस्थेच्या विश्वासार्ह अर्थकारणावर विश्वासून ठेवीदारांनी सहकारातील या अग्रनामांकित संस्थेत गुंतवणूक करण्याला प्राधान्य दिले. संस्थेच्या एकूण ठेवी २५७ कोटी झाल्या असून या ठेव वृद्धीमासात ५ कोटी ६० लाख रुपयांचे ठेव संकलन पहिल्या ११ दिवसातच झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73767 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..