
लांजा-लांजा तालुक्यात लावणीच्या कामांना वेग
-rat3p20.jpg
33415
लांजा ः तालुक्यात लावणीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. (छाया ः रवींद्र साळवी, लांजा)
--------------
लांजा तालुक्यात
लावणीच्या कामांना वेग
लांजा, ता. ३ ः जून महिन्यात सुरवातीच्या पंधरवड्यात रेंगाळलेल्या पावसाने अखेरच्या टप्प्यात दमदार हजेरी लावल्याने तालुक्यात शेतीच्या कामांनी वेग घेतला आहे. यामध्ये काही ठिकाणी पारंपरिक बैलजोड्या, तर काही ठिकाणी यंत्राच्या साह्याने लावणीच्या कामाने वेग घेतला आहे. जूनचा पंधरवडा झाल्यानंतरही पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. शेतीच्या कामासाठी पाऊस पुरेसा नसल्याने बळिराजा हवालदिल झाला होता. त्यामुळे शेतीची कामे खोळंबली होती. मृग नक्षत्रात पावसाने दडी मारल्याने करायचे काय, असा प्रश्न शेतकरी वर्गासमोर निर्माण झाला होता. मात्र, जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतीच्या कामांनी वेग घेतला. सध्या पडणारा पाऊस शेतीपूरक असल्याने व भातरोपांची चांगली वाढ झाल्याने लावणीची कामे वेगाने सुरू झाली आहेत.
-------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73773 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..