पावस-प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावस-प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद
पावस-प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

पावस-प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

sakal_logo
By

rat3p25.jpg-
33444
राजापूरः विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिक्षणाधिकारी वामन जगदाळे.
-----------
प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी
साधला विद्यार्थ्यांशी संवाद
राजापुरातील शाळांना भेटी; शिक्षकांना दिल्या सूचना
पावस, ता. ३ ः प्राथमिक शिक्षणाधिकारी वामन जगदाळे यांनी राजापूर पंचायत समिती व प्राथमिक शाळांना भेट देऊन पाहणी केली. शाळा भेटी दरम्यान प्रत्यक्ष वर्ग भेटीमध्ये प्रत्येक मुलाशी संपर्क साधून मराठी लेखन वाचन गणितीय संख्याओळख, वाचन, लेखन यांची पडताळणी केली. अध्ययन सुलभ होण्याच्या दृष्टीने शिक्षकांनी कसे प्रयत्न करणे गरजेचे आहे त्याबाबत शिक्षकांनाही प्रसंगी मार्गदर्शन केले.
शालेय पोषण आहार योजना, धान्य धान्यादी मालाचा पुरवठा याबाबत तालुका पातळीवर योग्य त्या सूचना दिल्या. शाळा इमारती धोकादायक, वर्ग खोल्या बांधकामे यांची आपत्कालीन परिस्थितीमध्ये योग्य ती दक्षता घेण्यासंदर्भात मुख्याध्यापकांना सांगण्यात आले. पाचवी, आठवीमधील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्यादृष्टीने पायाभूत संकल्पना शाळास्तरावर चांगल्या प्रकारे करून घेतल्यास यश नक्की मिळते, याबाबत सर्व शिक्षकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला. या वेळी गटशिक्षणाधिकारी श्री. कडू, विस्तार अधिकारी श्री. वडके, कशेळी केंद्राचे केंद्रीय प्रमुख सुनील जायदे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73793 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..