ऐनवेळी प्लॅटफॉर्म बदलल्याने प्रवाशांचा गोंधळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऐनवेळी प्लॅटफॉर्म बदलल्याने प्रवाशांचा गोंधळ
ऐनवेळी प्लॅटफॉर्म बदलल्याने प्रवाशांचा गोंधळ

ऐनवेळी प्लॅटफॉर्म बदलल्याने प्रवाशांचा गोंधळ

sakal_logo
By

ऐनवेळी प्लॅटफॉर्म बदलल्याने गोंधळ
वालोपे रेल्वे स्थानकावरील प्रकार ; वृद्ध, लहान मुलांचे हाल
चिपळूण, ता. ३ ः चिपळूण येथील रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मागील काही दिवसापासून मोठ्या त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. रेल्वे एका प्लॅटफॉर्मवर येणार असते, मात्र शेवटच्या क्षणी दुसऱ्याच प्लॅटफॉर्मवर येणार असल्याची घोषणा केली जाते. त्यामुळे प्रवाशांची विनाकारण धावपळ आणि दमछाक होते. हा प्रकार आता सर्रास वाढू लागला आहे. प्लॅटफॉर्मवर गाडी येण्याच्या काही मिनिटे अगोदर याबाबतची घोषणा केली जाते. त्यामुळे गाडी आली रे आली पळा असे सांगत प्रवासी जागा पकडण्यासाठी धावत पळत सुटतात.
कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते त्यातच आता रेल्वे प्लॅटफॉर्मवर तक्रारी वाढल्या आहेत. ज्या प्लॅटफॉर्मवर रेल्वे येणार आहे, त्या प्लॅटफॉर्मवर प्रवासी रेल्वेची वाट पाहत थांबलेले असतात. मात्र शेवटच्या क्षणी अचानक प्लॅटफॉर्म बदलण्याची घोषणा केली जाते. ठरवून दिलेल्या प्लॅटफॉर्मवर रेल्वे येण्याऐवजी दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर येत असल्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडते. अशावेळी अपंग वृद्ध महिला व लहान मुलांचे हाल होतात. त्याचबरोबर जड सामान घेऊन जाणाऱ्या प्रवाशांना समस्यांना सामोरे जावे लागते. वारंवार असा प्रकार होत असल्यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाकडून या़कडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रवासी करीत आहेत.
चिपळूण रेल्वे स्थानकावरून दररोज शेकडो प्रवासी प्रवास करतात. यात चाकरमानी, नोकरदार, पर्यटक, व्यापारी, उद्योजक या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र रेल्वे स्थानकावर नियोजन नसल्याने अशा घटना वाढत आहेत. ३१ जूनपासून जनरल तिकीटांची विक्री सुरू झाली आहे त्यामुळे प्रवाशांची संख्या देखील वाढली आहे. त्यात प्लॅटफॉर्मवर रेल्वेची वाट पाहत थांबणाऱ्या प्रवाशांची मात्र ऐनवेळी दुसऱ्याच प्लॅटफॉर्मवर गाडी येत असल्याने तारांबळ उडत आहे.
-------------
कोट
चिपळूण रेल्वे स्थानकावर ये-जा करणाऱ्या गाड्यांची स्थिती समजण्यासाठी प्लॅटफॉर्मवर कोच इंडिकेटर लावण्यात आले आहेत. गाडी आल्यानंतर देखील इंडिकेटरवर डब्यांची स्थिती चुकीच्या पद्धतीने दाखवली जात असल्याने याचाही प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ऐनवेळी प्रवाशांना धावपळ करावी लागते. आपले साहित्य घेऊन धावपळ करत आपला डबा गाठावा लागतो.
या प्रकाराकडे रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
- मिलिंद कदम, प्रवासी, चिपळूण

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73797 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..