चिपळूण तालुक्यात शेतीसाठी मिळेना नांगरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

No plow for agriculture in Chiplun taluka
चिपळूण तालुक्यात शेतीसाठी मिळेना नांगरी

चिपळूण तालुक्यात शेतीसाठी मिळेना नांगरी

चिपळूण - पावसाळा सुरू झाल्याने बळीराजा शेतीच्या कामात गुंतला आहे. यांत्रिकीकरणाच्या युगातही जिल्ह्यातील अनेक शेतकरी नांगरणीसाठी बैलाचा शोध घेत आहेत. १२०० रुपये हजेरी देऊनही नांगरी मिळत नाही. त्यामुळे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा हिरमोड होत आहे.

नांगराच्या फाळाने छोट्या शेतात सहज शेती करता येते. त्यामुळे तुकड्यांच्या शेतीसाठी यंत्राद्वारे नांगरणी पेक्षा पारंपरिक नागरणीला प्राधान्य दिले जात आहे. तालुक्यात यावर्षी १२ हजार हेक्टरवर भात शेती केली जाणार आहे. पावसाने हजेरी लावताच पेरणीसाठी जमीन नांगरणीला सुरुवात झाली. आता भात रोपे तरारली असून लावणीची लगबग सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांना शेतीसाठी नांगरी हवा आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे बैलजोडी आणि नांगरी आहे त्यांनी शेतीची कामे सुरू केली आहेत. मात्र त्यांच्याकडे बैल आणि नांगरी नाही, त्यांची शेती मागे पडली आहे. जिल्ह्यातील भातशेती ही तुकड्यांमध्ये विभागली आहे. डोंगर उतारावर दुर्गम भागात शेती असल्याने तसेच शेताभोवती असलेले बांध यामुळे येथे ट्रॅक्टरने नांगरणी करण्यात अडचणी येतात. मात्र पारंपारिक नांगर व बैलांना कुठेही सहज नेता येते.

नांगरणीचा फळामुळे जमीन अधिक भुसभुशीत होते नागरणीसाठी बैल जुंपण्याला अनेक जण शुभ मानतात. तसेच बैलाच्या पायामुळे तण व गवत मरते यामुळे बैलांच्या नांगरणीला आजही पसंती दिली जाते. खडपोली येथील शेतकरी रवींद्र मोहिते म्हणाले, आम्ही दरवर्षीत शेतीसाठी बैलांच्या नागरणीलाच पहिली पसंती देतो. ट्रॅक्टरपेक्षा पारंपारिक पद्धतीने नांगरणी चांगली होते. बैलाच्या पायामुळे गवत तण मरतात मात्र असे नांगर हल्ली फारसे मिळत नाहीत. मजुरीही वाढली आहे.

हौस म्हणून शेती करतो. चार गुरेही संभाळत आहे त्यांना सांभाळण्यासाठी एक जोडपे ठेवले आहे परंतू नांगरी करण्यासाठी नांगरी मिळत नाही त्यामुळे शेतीची कामे थांबली आहेत.
- मनीष बापट, खडपोली.

सातशे रुपये हजेरी
शेतीमध्ये राबणाऱ्या महिलांना पूर्वी तीनशे रुपये आणि पुरुषांना पाचशे रुपये हजेरी दिली जात होती. आता महिलांना चारशे ते पाचशे रुपये तर पुरुषांना सातशे रुपये हजेरी देवूनसुद्धा ते कामावर येत नाही त्यामुळे मजुरांचाही तुटवडा भासत आहे.

दोनवेळा चहा, सकाळी भाजी भाकरीही
काही शेतकऱ्यांकडे बैल आहेत. परंतू नागर चालवण्यासाठी नांगरी नाही. नागर चालवणे तसे अंग मेहनतीचे काम असल्यामुळे नांगरी म्हणून काम करण्यास कोणी तयार नाही. हौशेने शेती करणारे शेतकरी दिवसा १२०० रुपये हजेरी, दुपारचे जेवण दोनवेळा चहा, सकाळी भाजी भाकरी देण्यास तयार आहेत, तरीही नांगरी मिळत नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73798 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..