
देवगड महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण
33454
देवगड ः येथील महाविद्यालयात वृक्षारोपणास जमलेले मान्यवर.
देवगड महाविद्यालय
परिसरात वृक्षारोपण
देवगड, ता. ३ ः कृषिदिनाचे औचित्य साधून येथील स. ह. केळकर महाविद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. देवगड महाविद्यालय आणि सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान, कृषी विज्ञान केंद्र, सिंधदुर्ग यांच्यातील सामंजस्य करार झाल्यानंतर पहिला कार्यक्रम म्हणून महाराष्ट्र कृषिदिन साजरा करण्यात आला. याचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या आवारात प्रभारी प्राचार्या सुखदा जांबळे व जिल्हा कृषी प्रतिष्ठान, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ संशोधक भास्कर काजरेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी श्री. काजरेकर यांनी परंपरागत आणि सेंद्रीय शेती या अनुषंगाने मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा कृषी प्रतिष्ठान, कृषी विज्ञान केंद्राचे संशोधक विकास धामापूरकर, महाविद्यालायचे उपप्राचार्य डॉ. एल. एस. सुरवसे, प्रा. श्रीकांत सीरसाठे, प्रा. प्रल्हाद देशमुख, प्रा. सचिन दहिबावकर, प्रा. संदीप तेली, डॉ. नितीन वळंजू, प्रा. स्वप्नील वाळके आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73810 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..