
कुलभूषण गवस यांना लेफ्टनंट जनरल हुद्दा
33500
कुलभूषण गवस
कुलभूषण गवस
‘लेफ्टनंट जनरल’
सावंतवाडी, ता. ३ ः डोंगरपालचे सुपुत्र मेजर जनरल कुलभूषण गवस यांना १ जुलैपासून ‘लेफ्टनंट जनरल’ हा हुद्दा प्राप्त झाला. गवस यांचे माध्यमिक शिक्षण बेळगाव येथील मिलिटरी स्कूल येथे झाले. पुढे त्यांची पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीतील अभ्यासक्रमासाठी निवड झाली. तेथील अभ्यासक्रम शिक्षण पूर्ण झाल्यावर डेहराडून येथील सैन्य प्रबोधनीतील शिक्षण पूर्ण करून सेनादलात रुजू झाले. त्यांनी सैन्यातील विविध शिक्षण पूर्ण केले आहे. अलीकडेच ५ जून रोजी श्री.गवस यांनी डोंगरपाल गावाला सपत्नीक भेट देऊन ग्रामदेवता श्री माऊली देवीचे आशीर्वाद घेतले. लेफ्टनंट जनरल गवस यांचे वडील (कै.) हनुमंत गवस हे माजी सैनिक होते. त्यांचे आजोबा (कै.) लक्ष्मण गवसही सैन्य दलात होते. त्यांनी पहिल्या महायुद्धात प्रत्यक्ष सहभाग घेतला होता.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73866 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..