५ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

५

sakal_logo
By

अमली पदार्थविरोधी जागृती मोहीम
पावस ः पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याच्यावतीने अंतर्गत गावांमध्ये अमली पदार्थ जनजागृती मोहिमेचे आयोजन केले होते. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या पोलिस ठाणे अंतर्गत शिवार आंबेरे, पावस रिक्षास्टॅन्ड, परशुराम मंदिर आदी ठिकाणी जनजागृती केली. या वेळी पोलिस अंमलदार सावंत यांनी या भागांमध्ये अमली पदार्थांचे सेवन केल्याने आपल्या शरीरावर कोणते वाईट परिणाम होतात,या विषयी जागृती केली. या वेळी पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याचे सर्व अंमलदार उपस्थित होते. त्यानंतर पावस येथील आनंदी अनुसया महिला वृद्धाश्रमामध्ये भेट देऊन तेथील वृद्ध महिलांना खाऊ वाटप केले.
------------
आजची मुले उद्याचे भविष्यः साळवी
चिपळूण ः शिक्षण उत्तेजक मंडळ असूर्डे कासारवाडी संचलित खासगी वसंत शाळा, असुर्डे कासारवाडी या शाळेत गरजू व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी मुख्याध्यापिका उल्का साळवी यांनी स्वागत केले. यानंतर विद्यार्थ्यांना वह्या, ड्रॉईंगबुक, कलरबॉक्स, कंपासपेट्या, दप्तर आदी शालेय साहित्यांचे मोफत वाटप अवधूत साळवी, मनसे उपविभाग अध्यक्ष गोरेगाव यांच्या हस्ते करण्यात आले. साळवी म्हणाले, आजची मुले उद्याचे भवितव्य आहेत. कोकणातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व समजावे व नैपुण्य प्राप्त व्हावे, म्हणून विद्यालयासाठी कलरप्रिंटर, स्कॅनर आदी साहित्य देण्यात आले. शंकर बाळू खापरे, सुभाष गुरव, महेंद्र नरोटे, पंकज साळवी, उद्धव साळवी आदी उपस्थित होते. सुनीता अवघडे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73880 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..