सिंधुदुर्गात नवे १५ कोरोना रुग्ण 15 कोरोना रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्गात नवे १५ कोरोना रुग्ण

15 कोरोना रुग्ण
सिंधुदुर्गात नवे १५ कोरोना रुग्ण 15 कोरोना रुग्ण

सिंधुदुर्गात नवे १५ कोरोना रुग्ण 15 कोरोना रुग्ण

sakal_logo
By

सिंधुदुर्गात नवे
१५ कोरोना रुग्ण
८३ सक्रिय; एक जण कोरोनामुक्त
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ३ ः जिल्ह्यात आज पुन्हा १५ कोरोनाचे रुग्ण मिळाले. एकाने कोरोनावर मात केली. यामुळे सक्रिय रुग्ण संख्या ८३ आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५७ हजार ६३६ बाधित आढळले. यातील ५६ हजार २० रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत १५३३ मृत्यू आहेत. सक्रिय रुग्ण सर्व हे सर्व रुग्ण होम आयसोलेटेड आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. जिल्ह्यात आज मिळालेले रुग्ण (कंसात एकूण रुग्ण) ः देवगड ३ (६९७९), दोडामार्ग ० (३२६४), कणकवली ० (१०६३७), कुडाळ ७ (११९१७), मालवण ० (८२७०), सावंतवाडी १ (८५४३), वैभववाडी ० (२५६६), वेंगुर्ले ४ (५१३८), जिल्ह्याबाहेरील ० (३२२). तालुकानिहाय सक्रिय रुग्ण (कंसात मृत्यूचा आकडा) ः देवगड १० (१८५), दोडामार्ग ७ (४७), कणकवली ६ (३२१), कुडाळ २२ (२५४), मालवण ४ (३०१), सावंतवाडी १४ (२१७), वैभववाडी १ (८३), वेंगुर्ले १९ (११६) जिल्ह्याबाहेरील रुग्ण ० (९).
आर.टी.पी.सी.आरद्वारे टेस्टमध्ये ३ लाख ४२ हजार ६१७ नमुने तपासण्यात आले. यातील ४१ हजार ३६७ नमुने पॉझिटिव्ह आहेत. आज नव्याने ३२४ नमुने घेण्यात आले. अॅन्टिजेनव्दारे एकूण २ लाख ९८ हजार ८६५ नमुने तपासले. पैकी १६ हजार ४६८ नमुने पॉझिटिव्ह आहेत. आज नवीन ७७ नमुने घेतले. आतापर्यंत एकूण ६ लाख ४१ हजार ४८२ नमुने तपासण्यात आले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73881 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..