
पोमेंडीत मृद विश्लेषण प्रशिक्षण उत्साहात
पोमेंडीत मृद विश्लेषण प्रशिक्षण उत्साहात
लांजा, ता. ५ ः राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत मृद आरोग्य पत्रिका व जमीन आरोग्य व्यवस्थापन विभागस्तरीय मृद विश्लेषण प्रशिक्षण वर्ग झाला. जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळा पोमेंडी खुर्द येथे हे दोन दिवसांचे विभागस्तरीय मृद विश्लेषण प्रशिक्षण झाले. प्रशिक्षण वर्गासाठी ठाणे जिल्हा मृद चाचणी प्रयोगशाळेतून १, रायगड जिल्हा मृद चाचणी प्रयोगशाळेतून २, सिंधुदुर्ग मृद चाचणी प्रयोगशाळेतील २ व रत्नागिरी मृद चाचणी प्रयोगशाळेतील २ असे एकूण सात विश्लेषक उपस्थित होते. मृदा आरोग्य पत्रिकेनुसार १२ घटक तपासणीचे (सामू, क्षारता, सेंद्रिय कर्ब, नत्र ,स्फुरद, पालाश, गंधक, बोरॉन, जस्त, लोह, तांबे व मंगल) प्रशिक्षण देण्यात आले. कृषी अधिकारी आर. वाय. केदार, कृषी सहाय्यक श्रीमती लहाने, श्रीमती एस. एस. रानबरे, जी. व्ही. कोकणी यांनी सहकार्य केले.
कृषी विद्यावेत्ता डॉ. वैभव शिंदे यांनी मार्गदर्शन केले. तसेच एलसीजीसी कंपनीचे अभियंता लिंगराज यांनी नायट्रोजन काढण्याची प्रक्रिया समजावून सांगितली. तंत्र अधिकारी श्रीमती धावडे यांनी प्रयोगशाळेतील व्यवस्था, स्वच्छता व वेगवेगळ्या मशीनची दुरुस्ती व देखभाल याबद्दल मार्गदर्शन केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती नाईकनवरे यांनी प्रशिक्षणार्थींसोबत हितगुज करून स्वतः सर्व घटकांची माहिती करून घेतली. त्यांच्या हस्ते सर्व प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण यशस्वी पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. संपूर्ण प्रशिक्षणाचे नियोजन जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी एन. पी. भोये यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी पर्यवेक्षक शेखर शेट्ये यांनी केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y73993 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..