पाट हायस्कूलमध्ये साहित्य वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाट हायस्कूलमध्ये साहित्य वाटप
पाट हायस्कूलमध्ये साहित्य वाटप

पाट हायस्कूलमध्ये साहित्य वाटप

sakal_logo
By

33582
पाट ः विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देताना ऋणानुबंध ग्रुपचे पदाधिकारी.

पाट हायस्कूलमध्ये साहित्य वाटप
कुडाळ ः ऋणानुबंध ग्रुपतर्फे पाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तसेच गरजू विद्यार्थ्यांना गणवेश दिले. ग्रुपमधील महिला सदस्यांनी विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप केले. या कार्यक्रमास संस्थेतर्फे देवदत्त साळगावकर, खजिनदार अवधूत रेगे, राजेश सामंत, पर्यवेक्षक श्री. हंजनकर, कलाशिक्षक संदीप साळसकर, श्रीमती राणे आदी उपस्थित होते. ‘ऋणानुबंध’ ग्रुपतर्फे शंकर शिरसाट, चित्रा नेरुरकर, मयुर तवटे, आपा परब, प्रदीप पाटकर, गणेश जुवळे, भूषण तांडेल आदी उपस्थित होते. येत्या वर्षात बरेच कार्यक्रम शाळेत घेतले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी भविष्यात येणाऱ्या आव्हानांना तोंड देऊ शकतील. भविष्यातही विविध मुलांच्या हितोपयोगी कार्यक्रम विद्यालयात घेण्यात येतील, असे ग्रुपचे सदस्य तांडेल यांनी सांगितले. जुवळे यांनी आभार मानले.
..............
33583
सावंतवाडी ः गुणवंत विद्यार्थ्यांसमवेत समन्वय समितीचे पदाधिकारी.

सावंतवाडीत गुणवंतांचा गौरव
सावंतवाडी ः बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समिती सावंतवाडीच्यावतीने दहावी, बाराव मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार येथील श्रीराम वाचन मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. या कार्यक्रमाला दहावी, बारावीनंतर संधी आणि स्पर्धा परीक्षा याबाबतचे मार्गदर्शन प्रकाश राठोड यांनी केले. आयटीआय संदर्भात रामचंद्र जाधव यांनी मार्गदर्शन केले. सगुण जाधव यांनी बार्टी संस्थेच्या शैक्षणिक प्रगती करता योजना याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला समन्वय समितीचे अध्यक्ष कांता जाधव, उपाध्यक्ष दिलीप इन्सुलकर, सचिव जयराम जाधव, सहसचिव महेंद्र सावंत, कोषाध्यक्ष सुनील जाधव आदी उपस्थित होते.
-------------
33586
तळवडे ः वृक्षारोपण करताना शिक्षक, विद्यार्थी, पालक.

तळवडेत कृषिदिन उत्साहात
बांदा ः तळवडे इंग्लिश मीडियम स्कूल येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषिदिन साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. विविध फळझाडे, फुलझाडे, भाजी यांची लागवड करण्यात आली. विद्यार्थ्यांनी गटागटाने श्रमदान करून झाडे लावली. या कार्यक्रमानिमित्त जागृती फेरी काढून ‘झाडे जगवा, जीवन वाचवा’ अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. संस्थेच्या संचालिका मैथिली नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक अजय बांदेकर, सहाय्यक शिक्षिका दर्शना देसाई, दीक्षा नाईक, स्वप्नाली तांबे, प्रणिता मयेकर, अंकिता पालकर, वसंत सोनुर्लेकर, श्रद्धा पाईनाईक, श्रीया माणगावकर, प्रियांका रेडकर, निधी कांडरकर आदी उपस्थित होते.
.................
बांद्यात आजपासून योग शिबिर
बांदा ः प. पू. स्वामी रामदेव महाराज यांचे शिष्य स्वामी आनंददेव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली बांदा येथील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयात ५ ते ९ जुलै दरम्यान मोफत योग शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबिर ५, ६ व ९ जुलै रोजी पहाटे साडेपाच ते सात तर ७ आणि ८ जुलै रोजी सहा ते आठ या वेळेत होणार आहे. शिबिरात सर्व आजारांवर आवश्यक अद्ययावत योग, प्राणायाम व आयुर्वेद उपचार यासंबंधी मार्गदर्शन केले जाणार आहे. शिबिराचे आयोजन पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान, महिला व युवा पतंजली यांनी केले आहे. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांसाठी शिबिर खुले आहे. अधिक माहितीसाठी सुदान केसरकर, शेखर बांदेकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन भारत स्वाभिमान सिंधुदुर्ग संस्थेचे अध्यक्ष महेश भाट यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74004 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top