साखरपा-संगणक परिचालका चार महिने मानधनाविना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साखरपा-संगणक परिचालका चार महिने मानधनाविना
साखरपा-संगणक परिचालका चार महिने मानधनाविना

साखरपा-संगणक परिचालका चार महिने मानधनाविना

sakal_logo
By

पैसे चित्र वापरा
...
संगणक परिचालका चार महिने मानधनाविना

काम बंद आंदोलन सुरू; तुटपुंजे मानधनही वेळेवर नाही
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. ४ : ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत असलेल्या संगणक परिचालकांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. मागील चार महीने थकीत असलेले मानधन आणि आगामी माधनाबाबत असलेली अनिश्चितता या विरोधात जिल्हास्तरीय कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
संगणक परिचालक हे महिना सात हजार एवढ्या तुटपुंज्या मानधनावर काम करतात. मार्च महिन्यापासून हे परिचालक मानधनापासून वंचित आहेत. वारंवार मागणी करूनही हे मानधन खात्यावर वर्ग करण्यात आलेले नाही. संगणक परिचालकांचे वर्षभराचे मानधन हे ग्रामपंचायतीकडून जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात येते. त्यानंतर जिल्हा परिषद हे मानधन ठेकेदार कंपनी सी. एस. सी.कडे वर्ग करते. ही कंपनी त्यातील आपला वाटा काढून घेऊन उर्वरित मानधन परिचालकांच्या खात्यावर जमा करते. चालू आर्थिक वर्षाचे मानधन अद्याप जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आलेले नाही. त्यामुळे मागील आर्थिक वर्षात जमा असलेल्या मानधनातून परिचालकांचे केवळ मार्च महिन्याचे मानधन अदा होऊ शकते. एप्रिल, मे आणि जून महिन्यांचे मानधन मात्र पुढील काही काळ थकीतच रहाण्याची चिन्हे दिसत आहेत.
ह्या सगळ्या भोंगळ कारभाराविरोधात परिचालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. मुळातच तुटमुंजे मानधन आणि तेही चार महिने थकीत ह्याबाबत परिचालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74019 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top