रत्नागिरी : परशुराम घाट धोकादायक ; पेढे बौद्धवाडीतील कुटुंबांचे स्थलांतर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Parashuram Ghat is dangerous Migration of families from Pede Boudhwadi chiplun
चिपळूण - पेढे बौद्धवाडीतील कुटुंबांचे स्थलांतर

रत्नागिरी : परशुराम घाट धोकादायक ; पेढे बौद्धवाडीतील कुटुंबांचे स्थलांतर

चिपळूण - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर परशुराम घाटात शनिवारी (ता. २ जुलै) रात्री अकराच्या सुमारास डोंगरातील मातीचा भराव महामार्गावर आला. परिणामी, महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या पेढे बौद्धवाडीतील दहा कुटुंबांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत परशुराम घाटात गेल्या वर्षभरापासून डोंगरकटाईचे काम सुरू आहे. दरड कोसळू नये, यासाठी स्टेपिंग पद्धतीने डोंगरकटाई केली जात आहे. दरम्यान, पावसाळा सुरू होताच काही ठिकाणी किरकोळ प्रमाणात दरडी कोसळत असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या. त्यातच शनिवारी रात्री अकराच्या सुमारास पेढे बौद्धवाडीच्या वरील बाजूस मातीचा भराव महामार्गावर आला.

या घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी, ठेकेदार कंपनीची यंत्रणा, महसूल आणि पंचायत समितीची यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. रात्री एकपर्यंत दरड हटवण्याचे काम सुरू होते. त्यामुळे दोन्ही बाजूंकडील वाहतूक बंद केली होती. दरड लोकवस्तीत येऊ नये, यासाठी घाटात संरक्षक भिंती उभारण्यात आल्या आहेत; मात्र खबरदारीचा उपाय म्हणून खालील बाजूस असलेल्या सुरक्षित ठिकाणी तात्पुरते स्थलांतर करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74023 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top