स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण गरजेचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण गरजेचे
स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण गरजेचे

स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण गरजेचे

sakal_logo
By

33585
सावंतवाडी ः कराटेमध्ये प्राविण्य मिळवलेल्या मुलांचा गौरव करताना कॅप्टन एस. जी. दुराई, पोलिस निरीक्षक शंकर कोरे, पत्रकार संतोष सावंत, राष्ट्रवादीचे पुंडलिक दळवी, प्रा. सुभाष गोवेकर, दिलीप राऊळ आदी.

कराटे, क्रीडा प्रशिक्षण गरजेचे

पोलिस निरीक्षक शंकर कोरे ः सावंतवाडीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ४ ः स्वसंरक्षण आज प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंगी असायला हवे. शालेय अभ्यासक्रमाबरोबर शारीरिक सुदृढतेसाठी पालकांनी पाल्यांना कराटे, क्रीडा प्रशिक्षणही द्यावे. त्यातून तरुण पिढी सुदृढ आणि सक्षम बनेल, असे मत सावंतवाडीचे पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांनी व्यक्त केले.
ओकिनावा गो जू कान कराटे मार्शल आर्ट असोसिएशन, सिंधुदुर्गच्या वतीने येथील कळसुलकर हायस्कूलमध्ये कराटेमध्ये प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत मुलांचा गौरव करण्यात आला. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा बॉडी बिल्डर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी, कॅप्टन एस. सी. दुराई, पत्रकार अॅड. संतोष सावंत, योगा अभ्यासक प्रा. सुभाष गोवेकर, प्रशिक्षक व माजी सैनिक दिलीप राऊळ आदी उपस्थित होते.
यावेळी सावंतवाडी, कुडाळ. ओरोस येथील कराटे विद्यार्थ्यांचा बेल्ट व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. पत्रकार ॲड. सावंत यांनी कराटे प्रशिक्षणाची प्रत्येक शाळेत तासिका घ्यावी, जेणेकरून शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे मिळतील. शासनाने त्यासाठी तरतूद करावी. यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष कॅप्टन दुराई यांनी, ताणतणाव कमी करून मन आणि आरोग्य सक्षम ठेवण्याच्या दृष्टीने कराटे हा उत्तम मार्ग आहे, असे स्पष्ट केले. पालक नंदकिशोर गावडे, हेमंत गवस, श्री. नायबागकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रशिक्षक दिलीप राऊळ यांनी प्रास्ताविक केले. चार वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ, सावंतवाडी, ओरोस या ठिकाणी मुलांना कराटे प्रशिक्षण देत आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांबरोबर त्यांना सुदृढ बनविण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न आहेत, असे सांगितले. गणेश डिचोलकर यांनी आभार मानले.
---
प्रशिक्षणासाठी सहकार्य करू
कराटे हे स्वसंरक्षणाबरोबर मन शांत ठेवण्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना निश्चितपणे अशा प्रशिक्षण वर्गात पाल्यांना पाठवावे. या प्रशिक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही श्री. दळवी यांनी दिली. प्रा. गोवेकर यांनी योगा आणि कराटे या दोन्हीचे प्रशिक्षण मुलांनी शालेय जीवनापासूनच घ्यायला हवे. यातून तुम्ही पुढच्या काळात यशस्वी जीवन जगू शकाल, असे सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74024 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..