खेड-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त पट्टा
खेड-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त पट्टा

खेड-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

तिमिरातूनी तेजाकडे
मैफलीचे आयोजन
खेड ः तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा विश्‍व प्रतिष्ठानच्यावतीने आषाढी एकादशीचे औचित्य साधून १० जुलैला सायंकाळी ६ वा. मंडणगड तालुक्यातील घराडी येथील स्नेहज्योती अंध विद्यालयातील गुणवान अंध मुलांच्या तिमिरातूनी तेजाकडे या अनोख्या संगीतमय मैफल होणार आहे. जे दृष्टिहीन आहेत, तरीही ते आपल्या जीवनात दृष्टीपलिकडे आनंद देण्यासाठी श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात येत आहेत. विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्‍यांसह प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या साक्षीने अंध विद्यार्थ्यांची अनोखी मैफल रंगणार आहे. मैफलीत सहभागी व्हावे, असे आवाहन श्री समर्थ कृपा विश्‍व प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुयश पाष्टे यांनी केले.
---------
राजेश पत्याणे यांची निवड
साखरपा ः कॉंग्रेसच्या ग्राहक संरक्षण विभागाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी राजेश पत्याणे यांची निवड केली आहे. ग्राहक संरक्षण विभागाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नितीन पाटील यांच्या हस्ते त्यांना नुकतेच नियुक्तीपत्र देण्यात आले. साखरपा येथील राजेश पत्याणे हे युवक दशेपासून कॉंग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी प्रारंभी एनएसयूआयच्या जनरल सेक्रेटरी म्हणून काम केले. त्यानंतर युवक कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा कॉंग्रेस कमिटी सचिव, रस्ता सुरक्षा कमिटी सदस्य, शिक्षक सेल जिल्हाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष अशा महत्वाच्या पदांवर काम केले आहे.
--------
-ratchl४६.jpg
L33610
- ईश्वरी कोटकर
------------
अॅबॅकस स्पर्धेत
ईश्वरीचे यश
चिपळूण ः कोल्हापूर येथे झालेल्या प्रोऍक्टिव्ह अॅबॅकस नॅशनल समर कॉम्पिटिशन २०२२ (साऊथ झोन) या स्पर्धेत काविळतळी येथील प्रोऍक्टिव्ह अबॅकस अॅकॅडमीची विद्यार्थिनी ईश्वरी दिग्विजय कोटकरने (दुसरी) लेवल २ मध्ये ४ था क्रमांक पटकावून ट्रॉफी मिळवली. लेवल १ मध्ये कैवल्य कैलास कोटकरने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले. ६ मिनिटांत १०० गणिते सोडवणे, असे स्पर्धेचे स्वरूप होते. सदर स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा तसेच कर्नाटक राज्यातील एकूण १००७ विद्यार्थी सहभागी झाले होते. अॅबॅकस अॅकॅडमीचे संचालक गिरीष करडे, अजय मणियार उपस्थित होते. विद्यार्थ्यांना अॅबॅकस अॅकॅडमीच्या संचालिका कुमुदिनी खेराडे व धनश्री खेराडे यांचे मार्गदर्शन लाभले.
-----------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74027 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..