सिंधुदुर्ग : मनसेचे अमित ठाकरे जिल्हा दौऱ्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amit Thackeray
मनसेचे अमित ठाकरे आज जिल्हा दौऱ्यावर

सिंधुदुर्ग : मनसेचे अमित ठाकरे जिल्हा दौऱ्यावर

कणकवली - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी मनसेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. उद्यापासून (ता. ५) गुरुवारपर्यंत (ता. ७) सावंतवाडी येथून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. यावेळी तीनही विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन चर्चा केली जाणार असल्याची माहिती मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. या दौऱ्यामध्ये विद्यार्थी संघटना मजबूत करणे, मनसेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणे तसेच विविध कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन पक्ष संघटना वाढीसंदर्भात विचार विनिमय केला जाणार आहे.

उपरकर म्हणाले, ‘सावंतवाडी शहरात उद्या सकाळी अकराला श्री. ठाकरे यांचे आगमन होणार आहे. यावेळी शहरातील मँगो हॉटेलमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठका होणार आहेत. सावंतवाडी मतदारसंघातील तिन्ही तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची चर्चा तसेच विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा होणार आहे. त्यानंतर दुपारी तीन वाजता सावंतवाडी राजवाडा येथे भेट, त्यानंतर पाटेश्वर मंदिराचे दर्शन, साडेतीन वाजता बांदेकर फाईन आर्ट कॉलेज येथे विद्यार्थ्यांची संवाद, साडेचारच्या सुमारास सावंतवाडीच्या लाकडी खेळणी बाजारामध्ये भेट देऊन तेथील उत्पादकांशी चर्चा, त्यानंतर सायंकाळी पाच वाजता कुडाळ एमआयडीसी येथे मुक्काम.

बुधवारी (ता. ६) सकाळी दहाला एमआयडीसी येथे जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारणीचा सत्कार आणि पत्रकारांची संवाद, मराठा मंडळ कुडाळ येथे कुडाळ- मालवण मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी सकाळी साडेदहा वाजता संवाद, दुपारी बाराला जिल्ह्यातील ठाकर समाज आणि राष्ट्रपती पुरस्कार विजेत्यांचा सत्कार, कणकवली तालुक्यामध्ये दुपारी अडीचच्या सुमारात भगवती मंगल कार्यालयात कणकवली मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक आणि चर्चा तसेच विविध वृत्तपत्रांच्या पत्रकार आणि सोशल मीडिया प्रमुखांची चर्चा, सायंकाळी पाच वाजता मसुरे आंगणेवाडी येथे भराडी देवीचे दर्शन, तेथून मालवण शहरातील मनसे कार्यकर्त्यांची चर्चा आणि देवबागला मुक्काम. गुरुवारी (ता. ७) कुणकेश्वर मंदिरात दर्शन घेऊन थेट रत्नागिरीकडे रवाना होणार आहेत. पुढे ते रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. हा दौरा ११ जुलैपर्यंत आहे.’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74043 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..