सर्वसामान्य कार्यकर्ता शिवसेनेसोबतच - सतीश सावंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satish Sawant
टुडे पान एक-सर्वसामान्य कार्यकर्ता शिवसेनेसोबत

सर्वसामान्य कार्यकर्ता शिवसेनेसोबतच - सतीश सावंत

देवगड - शिवसेना पक्षातून गेलेले आमदार जनतेच्या सोयीसाठी नसून स्वतःच्या फायद्यासाठी गेले आहेत. नेते शिवसेना सोडून गेले असले, तरी सर्वसामान्य कार्यकर्ता पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासोबत असल्याचा दावा जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी आज जामसंडे येथे माध्यमांशी बोलताना केला. शिवसेनेची विभागणी करण्यात भाजपचा हात असल्याचा घणाघातही त्यांनी यावेळी केला.

जामसंडे येथील सांस्कृतिक भवनमध्ये तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांची सभा झाली. सभेनंतर श्री. सावंत माध्यमांशी बोलत होते. यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर, तालुकाप्रमुख मिलिंद साटम, विलास साळसकर, माजी सभापती रवींद्र जोगल, नगरसेवक संतोष तारी, निवृत्ती उर्फ बुवा तारी, निनाद देशपांडे आदी उपस्थित होते.

श्री. सावंत म्हणाले, ‘तालुका शिवसेना पदाधिकार्‍यांच्या बैठकीत सर्वांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीमागे ठामपणे राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते जागेवरच असून, पाऊस असूनही सर्वांनी सभेला उपस्थिती दर्शविली. कारवाईच्या भीतीने काहीजण शिवसेना सोडून गेले. आमदार वैभव नाईक मात्र ठाम राहिल्याबद्दल सभेत त्यांचे अभिनंदन करण्यात आले. ज्यांनी शिवसेनेशी फारकत घेतली, त्यांनी जनतेच्या सोयीसाठी नाही, तर स्वतःच्या स्वार्थासाठी घेतली आहे.’

सभेत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विलास साळसकर म्हणाले, ‘माजी पालकमंत्र्यांचा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असा प्रवास झाला आहे. त्यांनी हिंदुत्वावर बोलू नये. खासदार संजय राऊत यांचा राजीनामा मागण्याआधी सावंतवाडी मतदारसंघातून शिवसेना कार्यकर्त्यांनी निवडून दिल्याने त्यांनी आधी राजीनामा द्यावा. पक्षप्रमुखांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आरोग्य व रक्तदान शिबिर घेण्यात येईल. तसेच संघटनेला बळ देण्यासाठी श्री क्षेत्र कुणकेश्‍वर येथे अभिषेक केला जाईल.’

देवगड नगरपंचायतीला ५० लाख

देवगड जामसंडे नगरपंचायतीसाठी ५० लाखाचा निधी शिवसेनेच्या माध्यमातून आणला आहे. यामध्ये प्रभाग दोनमध्ये अद्ययावत व्यायामशाळेसाठी तीस लाख आणि जामसंडे तसेच मळई स्मशानभूमी दुरुस्तीला प्रत्येकी दहा लाखाचा निधी असल्याचे विलास साळसकर यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74059 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..