मंडणगड ः वर्षानंतर पणदेरी धरणाची स्थिती जैसे थे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंडणगड ः वर्षानंतर पणदेरी धरणाची स्थिती जैसे थे
मंडणगड ः वर्षानंतर पणदेरी धरणाची स्थिती जैसे थे

मंडणगड ः वर्षानंतर पणदेरी धरणाची स्थिती जैसे थे

sakal_logo
By

पा ७ मेन
..
बातमी मोठी लावावी
..
पणदेरी धरणः लोगो
....
फोटो काल सोडला
-rat४p१५.jpg
L३३५८९
पणदेरी ः मुख्य भिंतीला लागलेल्या गळतीमुळे पणदेरी धरण पुनर्बांधणी करावी लागणार आहे. (संग्रहित)
-------------
गळतीची वर्षपूर्ती; धरणाची जैसे थे स्थिती

कोट्यवधींचा खर्च उपयोगशून्य; मुख्य भिंतीच्या गळती; पुनर्बांधणी कधी?
सचिन माळी : सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ४ ः तालुक्यातील पणदेरी धरणाच्या मुख्य भिंतीला गतवर्षी ५ जुलै २०२१ ला मोठी गळती लागली आणि सर्वांचीच धावपळ उडाली. या घटनेला एक वर्ष पूर्ण होत असून, यानंतर या धरणाची अवस्था जैसे थे राहिली आहे. धरण पुनर्बांधणी करावी लागणार असल्याने त्याचा मुहूर्त कधी येतो, याकडे पंचक्रोशीचे लक्ष लागून राहिले आहे.
तिवेर धरणफुटीनंतर कोकणातील नादुरुस्त व अपूर्ण धरणाचा प्रश्न सार्वत्रिक चर्चेत आला होता. त्या घटनेच्या तीन वर्षानंतरही कोणतेही समाधानकारक पावले उचलेली गेली नसल्याचे तिवरे धरणफुटीनंतर झालेल्या इतिहासाची पुनरावृत्ती पणदेरी धरणाच्या बाबतीतही होण्याचे संकेत दुर्घटनेच्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त मिळत आहेत.
मुख्य कालवा भिंतीला गळती लागली व धरणात साठलेल्या पाण्याने धोक्याची पातळी गाठली. या संकटातून बाहेर पडण्यासाठी भरपावसात युद्धपातळीवर काम करत पाण्याची पातळी कमी करावी लागली होती. यासाठी पूर्ण जिल्ह्यातील यंत्रणा कामास लागली होती. धोका टळल्यावर यथावश गळती लागली, याचा अभ्यास करण्यात आला. वर्षभर धरणाची परिस्थिती ७५ टक्के धरण कोरडे अशी ठेवण्यात आली. परिसरातील जनतेला पाटबंधारे विभागाच्या व ग्रामपंचायतीमार्फत नोटीस बजावण्यात आली होती की, संपूर्ण धरणातील पाणीसाठा हा खाली करण्यात येणार आहे. त्यानंतर बहुतांश पाणीसाठा कमी करण्यात आला; पण डागडुजी सुरू करण्याआधी पाटबंधारे विभागाच्या नाशिक विभागीय कार्यालयाकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले होते. या कामी रत्नागिरी जिल्हा पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाठपुरावा सुरू होता.
....
चौकट
नवीन सर्वे होणार, नवीन डिझाईनही
गेल्या वर्षात निघालेल्या निष्कर्षानुसार, धरणाची पुन्हा पुन्हा डागडुजी करून काही उपयोग होणार नाही, असे सांगण्यात आले. स्ट्रक्चरल ऑडिटच्या रिपोर्टनुसार संपूर्ण धरणाची स्थिती ही बाद व धोकादायक अवस्थेत झाल्यासारखी शासनाच्या व पाटबंधारे विभागाला दिसून आली. पणदेरी धरणाची पुढील वाटचाल म्हणून या धरणाची पुनर्बांधणीसाठी शासनाच्यावतीने नवीन धरणाच्या बांधकामासंबंधित विचार झाला आहे. त्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा पाटबंधारे विभागाच्या वतीने नवीन सर्वे करून त्याचा अहवाल व आराखडा तयार करून धरणाची नवीन डिझाईन तयार करण्यात येत असल्याची माहिती पुढे येत आहे.
........
चौकट
प्रस्ताव सादर, बजेट मंजूर नाही वा बांधकाम नाहीच
दरम्यान, धरणाच्या नवीन पुनर्बांधकामसाठी नवीन प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे सादर करण्यात आला आहे. शासनाच्या आर्थिक बजेट मंजुरी मिळाल्यावर धरणाच्या नवीन बांधकामास सुरवात होईल, असे यंत्रणेकडून सांगण्यात आले होते; मात्र कोणतीही कृती घडली नाही.
------------
चौकट
शेतीसाठी नाही; पण पिण्याचा पाण्याचा प्रश्न निकाली
कालव्यांच्या अभावामुळे शेतीकामासाठी धरणाचा वापर झाला नाही, हे खरे असले तरी परिसरातील विहिरी, बोअरवेल यांचा पाणीसाठा कायम राहण्यासाठी याशिवाय जमिनीखालील पाणीसाठा वाढण्यासाठी नक्की मदत होत होती. याचा प्रत्यय धरणात पाणी नसल्याने परिसरातील विहिरी, विंधन विहिरी यांचे जलस्त्रोतांचे पाणी आटलेले दिसून आले. २५ वर्षांच्या कालावधीत या धरणांची निर्मिती व दुरुस्तीसाठी करोडो रुपयांचा निधी खर्च झाला असून मूळ उद्देशांप्रती काम झालेले दिसून न आल्याने निधी फुकट गेल्याची भावना असली तरी संकटकाळात पाण्याचा उपयोग करता येणे शक्य असल्याने धरणाचे निर्मितीकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आजही आहे.
..
चौकट
२५ वर्षांत जाणवली नाही अशी पाणीटंचाई
गेल्या वर्षभरात धरणासंदर्भात प्रशासकीय यंत्रणादोष दुरुस्त करायचे किंवा नवीन धरण बांधायचे यांचे अवलोकन करण्यातच यंत्रणा दंग राहिल्याने पंदेरी पंचक्रोशीत यंदाच्या उन्हळ्यात गेल्या २५ वर्षात जाणवली नाही, इतकी पाणीटंचाई आढळून आली. पावसात पाणीसाठाच होणार नसल्याने धोका नाही, हे खरे असले तरी चुकांमधून कोणताही बोध न घेण्याचे यंत्रणेने ठरवून टाकलेले असल्याचेही सिद्ध झाले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74078 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top