चिपळूण ः पावसाळ्यात परशुराम घाटातील वाहतूक बंद ठेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः पावसाळ्यात परशुराम घाटातील वाहतूक बंद ठेवा
चिपळूण ः पावसाळ्यात परशुराम घाटातील वाहतूक बंद ठेवा

चिपळूण ः पावसाळ्यात परशुराम घाटातील वाहतूक बंद ठेवा

sakal_logo
By

परशुराम घाटातील वाहतूक पावसाळ्यात बंद ठेवा

सरपंच पाकळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; दरडीमुळे ग्रामस्थांची झोप उडाली
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ४ ः पावसाळा झाल्यापासून परशुराम घाटातील डोंगराची पडझड होत आहे. २ जुलैच्या रात्री ११ वाजता घाटातील दरड रस्त्यावर आल्याने वाहतूक बंद झाली. यापूर्वी अनेकदा परशुराम घाटातील दरड कोसळली आहे. मोठमोठे दगडही खाली आले आहेत; परंतु रस्त्यालगत मोठे खड्डे असल्याने त्या खड्ड्यामध्ये ते साचून राहिले. आता रस्त्यालगतचे खड्डे भरलेले आहेत. यापुढे वरून येणारी माती, दगड हे रस्त्यावर येण्याची दाट शक्यता आहे. दरडीच्या भीतीने पेढे-परशुराम ग्रामस्थ भयभीत असून त्यांची झोप उडाली आहे. त्यामुळे परशुराम घाटातील वाहतूक रात्री ९ ते सकाळी ६ दरम्यान बंद ठेवावी, अशी मागणी पेढे सरपंच प्रवीण पाकळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
पाकळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार, परशुराम घाटात दरड कोसळण्याच्या आवाजामुळे ग्रामस्थ दचकून उठतात आणि इतर ग्रामस्थांशी फोनवरून संवाद साधतात. वारंवार कोसळत असलेल्या दरडीमुळे घाबरून पेढे-परशुराम ग्रामस्थांची झोप उडाली आहे. घाटात डोंगराच्या वरील आणि खालच्या बाजूने संरक्षक भिंत उभारण्याची मागणी केली असता केवळ खालच्या बाजूने भिंत घालण्यात आली. या मार्गावरून प्रवास करताना परशुराम घाट चालू झाल्यावर प्रवाशांच्या पोटात अक्षरशः भीतीचा गोळा येतो. कधी काय होईल, याचा भरवसा नाही. रात्रीच्यावेळी या घाटात भयानक वातावरण असते. रात्रीचा प्रवास करताना अचानक डोंगर खाली आल्यास प्रवाशी आपला जीव कसा वाचवणार, हा मोठा प्रश्न आहे. म्हणूनच कोणतीही दुर्घटना होऊ नये, वाहने दरडी खाली येऊ नयेत, जीवितहानी होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून परशुराम घाट अतिवृष्टीत पूर्णपणे बंद ठेवण्यात यावा. इतरवेळी रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत वाहतुकीस बंद ठेवावी.
परशुरामच्या रहिवाशांना लोटे, चिरणी, आंबडसमार्गे चिपळूणला यावे लागणार आहे. तर पेढेतील रहिवाशांना आंबडस, चिरणीमार्गे लोटे येथे जावे लागणार आहे. यापुढे मोठा पाऊस अजून बाकी आहे. पावसाचे पाणी जमिनीत जिरले असून, झरे चालू झालेले आहेत. डोंगराच्या वरील बाजूने संरक्षक भिंती नसल्यामुळे डोंगर कोसळून मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य धोका ओळखून परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद ठेवावा, अशी मागणी सरपंच पाकळे यांनी केली.
...
चौकट
अन्य मागण्या अशा..
अवजड वाहनांना बंदी ठेवावी. ही वाहतूक आंबडस चिरणीमार्गे लोटे अशी चालू ठेवावी. या मार्गावर दिशादर्शक फलक लावण्यात यावेत. पर्यायी वाहतूक व्यवस्था करताना पेढे-परशुराम येथील रहिवाशांचा प्रामुख्याने विचार करावा. येथील रहिवाशी नोकरीधंद्यानिमित्त लोटे, खेड, चिपळूण येथे जातात. मुले शाळा, कॉलेजमध्ये जातात. त्यांच्यासाठी पर्यायी वाहनव्यवस्था करणे गरजेचे आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74130 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top