राजापूर- शहरामध्ये घुसले पुराचे पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर- शहरामध्ये घुसले पुराचे पाणी
राजापूर- शहरामध्ये घुसले पुराचे पाणी

राजापूर- शहरामध्ये घुसले पुराचे पाणी

sakal_logo
By

rat4p44.jpg
33689
-राजापूर ः शहरातील शिवाजी पथ आदी परिसरात टपऱ्या पाण्याखाली गेल्या होत्या.
---
-rat4p51.jpg
33722
- राजापूर ः जवाहर चौकात भरलेले पाणी.
-------------
शहरामध्ये पुराचे पाणी; रस्ता पाण्याखाली!

राजापूरात दिवसभर पाऊसाचा जोर; शीळ, गोठणेदोनिवडे रस्ता पाण्याखाली, नद्यांच्या पाण्याची पातळीत वाढ
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ४ ः दिवसभर पडलेल्या पावसाने शहरातून वाहणाऱ्‍या अर्जुना-कोदवली नद्यां दुथडी भरून वाहू लागल्या आहे. नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली असली तरी अद्यापही धोकादायक पातळी ओलांडलेली नाही. मात्र, वाढलेल्या पाण्यामध्ये शहरातील चिंचबांध, वरचीपेठ परिसरासह शिवाजी पथ रस्ता पाण्याखाली गेला आहे. कोदवली नदीच्या काठावरील जवाहरचौकातील टपऱ्‍यांनजीक पूराचे पाणी आले आहे. तासागणिक नद्यांच्या पाण्याची पातळी वाढत होत चालली असून वाढणाऱ्‍या या पाण्यामुळे निर्माण होणाऱ्‍या संभाव्य पूरस्थितीने व्यापाऱ्‍यांच्या उरामध्ये धडकी भरवली होती.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आज सकाळपासून जोर धरला होता. त्यामध्ये तालुक्यातील पाचल परिसरातून वाहणार्‍या जामदा नदीच्या पाण्यामध्ये वाढ झाली आहे. मात्र, दुपारपर्यंत शहरातून वाहणाऱ्‍या अर्जुना-कोदवली नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली नव्हती. दुपारनंतर, दोन्ही नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये तासागणिक वाढ होवू लागली. त्यामध्ये शहरातील चिंचबांध परिसर पाण्याखाली गेली. त्यानंतर, हळूहळू शिवाजी पथ रस्ता, वरचीपेठ रस्ताही पाण्याखाली गेला. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला असला तरी, अर्जुना-कोदवली नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये सायंकाळी वाढ होवू लागली होती.
दरम्यान, सायंकाळी कोदवली नदीच्या वाढलेले पाणी जवाहरचौकातील काठावरील टपऱ्‍यांपर्यंत आले होते. तासागणिक अर्जुना-कोदवली नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत चालली आहे. दुथडी भरू वाहणाऱ्‍या या दोन्ही नद्यांनी अद्यापही धोक्याची पातळी ओलांडली नसली तरी, पाण्याची पातळी अशीच वाढत राहिली आणि त्याला पावसाची साथ मिळाल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नाही.
...
चौकट
माल सुरक्षित ठिकाणी हलवण्यास प्रारंभ
दरवर्षीच्या पूरस्थितीचा अनुभव असलेल्या व्यापाऱ्‍यांनीही संभाव्य पूरस्थिती ओळखून सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या उपाययोजना करण्याला सुरूवात केली आहे. त्यामध्ये दुकानांमध्ये कमी माल भरताना काही माल सुरक्षित ठिकाणी हलविण्यालाही सुरूवात केली आहे.
...
चौकट
शीळ, गोठणेदोनिवडे, चिखलगाव रस्ता पाण्याखाली
शीळ, गोठणेदोनिवडे, चिखलगाव रस्ता पाण्याखाली गेला असल्याने येथील वाहतूक बंद झाली आहे. यावर्षी प्रथमच जवाहर चौकात पुराच्या पाण्याने धडक दिली असून येथील टपऱ्या पाण्याखाली गेल्या आहेत.
----------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74131 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top