
वस्तूंवरील कमिशन वाढवा
टीपः swt४३९.jpg मध्ये फोटो आहे.
सावंतवाडी ः येथील तहसील कार्यालयासमोर आंदोलन करताना रेशन धान्य दुकानदार.
कमिशन वाढवा, मागण्यांची दखल घ्या
रेशन दुकानदारांची मागणी; सावंतवाडीत आंदोलन
सावंतवाडी, ता. ४ ः सरकारमान्य रेशन धान्य दुकानावर विकल्या जाणाऱ्या वस्तूंवरील कमिशन वाढवून मिळण्यासह इतर प्रलंबित मागण्यांबाबत शासनाचे सातत्याने लक्ष वेधूनही ठोस कार्यवाही होत नाही. त्यामुळे संतप्त रेशन धान्य दुकानदारांनी सोमवारी प्रत्येक तालुका तहसीलदार कार्यालयावर घोषणा देत भरपावसात धरणे आंदोलन छेडले.
यावेळी आपल्या मागण्यांबाबत निवेदन तहसीलदारांकडे सुपुर्द केले. येथील आंदोलनात तालुका रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गणपत राणे, उपाध्यक्ष तन्वी परब, सचिव अमेय गावडे, खजिनदार अनिकेत रेडकर, सोमनाथ परब, संतोष गावडे, संजय मळीक, शिवा लाड, सुरेश शेटवे, संगीता कोकरे, अर्जुन सावंत, मनीषा परब, संदीप गावडे, श्री. ठाकूर आदी सावंतवाडी तालुक्यातील सर्व रेशन दुकानदार उपस्थित होते. धान्य दुकानदारांच्या मागण्याबाबत येत्या आठ दिवसांत शासनाने निर्णय न घेतल्यास ११ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. त्यानंतरही याबाबत ठोस कार्यवाही न झाल्यास १८ रोजी मुंबईत आझाद मैदानावर राज्यस्तरीय धरणे आंदोलन छेडून मोर्चाद्वारे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार आहे. तसेच, २ ऑगस्ट रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर रेशन परवानाधारक कर्मचारी व कुटुंबासह देशव्यापी धरणे आंदोलन छेडून संसदेला घेराव घालण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. अनेक वेळा निवेदन देऊन कोणतीही कारवाई होत नसल्याने आता टोकाची लढाई लढू, असे स्पष्ट केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74140 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..