‘आरपीडी’जवळील चर धोकादायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘आरपीडी’जवळील चर धोकादायक
‘आरपीडी’जवळील चर धोकादायक

‘आरपीडी’जवळील चर धोकादायक

sakal_logo
By

‘आरपीडी’जवळील चर धोकादायक
सावंतवाडी, ता. ४ ः शहरातील आरपीडी हायस्कूलजवळ पाईप घालण्यासाठी रस्त्याची खोदाई करण्यात आली; मात्र त्यामुळे निर्माण झालेला चर नीट न बुजविल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. हा चर तत्काळ बुजविण्यात यावा, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे. हा चर पावसामुळे अधिक धोकादायक बनला आहे. दुचाकीस्वार वेगाने येत असताना चराचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याचा संभव आहे. गेल्या आठ दिवसांपासून या चराबाबत नगरपालिका प्रशासनाकडून कोणतीच दखल घेतली जात नसल्याने वाहनचालकांत नाराजी पसरली आहे. या मार्गावर शाळा, महाविद्यालये असल्याने विद्यार्थी ये-जा करतात. त्यामुळे अपघात घडल्यास विद्यार्थ्यांसाठी धोका होऊ शकतो. तत्काळ पालिकेने हा धोकादायक चर बुजवावा, अशी मागणी होत आहे

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74151 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..