पावस-जमिनीच्या वादातून दोन गटात धुमश्चक्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावस-जमिनीच्या वादातून दोन गटात धुमश्चक्री
पावस-जमिनीच्या वादातून दोन गटात धुमश्चक्री

पावस-जमिनीच्या वादातून दोन गटात धुमश्चक्री

sakal_logo
By

जमिनीच्या वादातून दोन गटात धुमश्चक्री

पावस नालेवठारमधील घटना; नऊ जणांना अटक व जामीन
पावस, ता. ४ : पावस नालेवठार येथे जमीन वादातून दोन गटात जोरदार हाणामारी झाली. यामध्ये नऊजण जखमी झाले असून अकरा जणांवर परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (ता. ३) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. यातील सात जणांवर रत्नागिरी शासकीय रुग्णालयात उपचार करून सोडण्यात आले. ताब्यात घेतलेल्या दोघांना रविवारी आणि अन्य सात जणांना सोमवारी (ता. ४) अटक केली. या नऊ जणांना न्यायालयाने जामीन मंजूर केला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी, कृष्णकांत अशोक भातडे (वय ३३, रा. पावस नाले वठार) यांनी याबाबत दिलल्या तक्रारीत म्हटले आहे की, सामायिक घरातील खोलीला कोणाचीही परवानगी न घेता हेमंत भातडे, शंकर भातडे, दिशा भातडे, दिनेश भातडे, लीना कुपटे या ५ जणांनी वेगळा दरवाजा पाडण्यास सुरवात केली. यावेळी कृष्णकांत भातडे यांनी हे काम रोखण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग मनात धरून ५ जणांनी त्यांना शिवीगाळ करत लाकडी बांबू व चिरेखाणीच्या लोखंडी फरशी डोक्यात मारून जखमी केले. या मारहाणीत गौरव महादेव भातडे, अभिजित अशोक भातडे, माधवी महादेव भातडे, कृष्णकांत अशोक भातडे, महादेव यशवंत भातडे, असे ५ जण जखमी झाले. याबाबतची फिर्याद कृष्णकांत भाताडे यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात दाखल केल्यानंतर हेमंत भातडे, शंकर भातडे, दिशा भातडे, दिनेश भातडे, लीना कुपटे अशा पाच जणांवर गुन्हा दाखल केला.
दिशा दिनेश भातडे (वय ३३, शितपवाडी, नालेवठार) यांनी परस्परविरोधी तक्रार दिली आहे. दीर राहत असलेल्या खोलीला स्वतंत्र दरवाजा पाडण्याचे काम चालू होते. या ठिकाणी येऊन अभिजित अशोक भातडे, कृष्णकांत अशोक भातडे, गौरव महादेव भातडे, महादेव यशवंत भातडे, सुरेखा भातडे, अशोक भातडे यांनी काम करण्यास विरोध केला. यावेळी दिशा भातडे यांचे पती दिनेश भातडे व दीर हेमंत भातडे यांना काठीने व दांडक्याने डाव्या हातावर व पाठीवर मारहाण केली. तसेच सासऱ्यांच्या डोक्यात दांडक्याने मारहाण केली. या वेळी पतीच्या गळ्यातील सोन्याची चेन तुटून नुकसान केले. या मारहाणीत हेमंत भातडे, शंकर भातडे, दिनेश भातडे, लीना कुपटे असे चौघेजण जखमी झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार अभिजित अशोक भातडे, कृष्णकांत अशोक भातडे, गौरव महादेव भातडे, महादेव यशवंत भातडे, सुरेखा भातडे, अशोक भातडे अशा सहा जणांवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर जखमी झालेल्या सात जणांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर रात्री उपचार झाल्यानंतर घरी सोडले. मात्र, अभिजित भातडे व दिनेश भातडे या दोन्ही बाजूच्या प्रत्येकी एकाला अटक केली. त्यांना पोलिस ठाण्यात हजर केले असता, दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. आज सकाळी जखमी झालेले ७ व पोलिस कोठडीतील दोघे अशा नऊ जणांना न्यायालयात हजर केले. या सर्वांना जामीन मंजूर करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार संदेश चव्हाण याचा अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74163 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..