रत्नागिरी ः बसरा स्टार जहाज 3 वर्षानंतरही किनाऱ्यावर खितपत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः बसरा स्टार जहाज 3 वर्षानंतरही किनाऱ्यावर खितपत
रत्नागिरी ः बसरा स्टार जहाज 3 वर्षानंतरही किनाऱ्यावर खितपत

रत्नागिरी ः बसरा स्टार जहाज 3 वर्षानंतरही किनाऱ्यावर खितपत

sakal_logo
By

टु १
-rat४p३८.jpg
L33679
रत्नागिरी ः मिऱ्या किनाऱ्यावर तीन वर्षे अडकून पडलेले बसरा स्टार जहाज.
-----------
बसरा स्टार जहाज ३ वर्षांनंतरही खितपत

भंगारात काढण्यास विलंब; केंद्राच्या परवानगीची प्रतीक्षा
रत्नागिरी, ता. ४ ः मिऱ्या समुद्रकिनारी अडकून अक्षरशः गंजून भंगार झालेले बसरा स्टार जहाज तिसऱ्या पावसाळ्यातही किनाऱ्यावर खितपत पडले आहे. जहाज काढण्यासाठी मोठा खर्च असल्याने दुबईतील एजन्सीने ते काढण्यात अनुत्सुकता दाखवली आहे. त्यानंतर हे जहाज भंगारात काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या. स्थानिक पातळीवर त्याचा ठेका दिला होता; परंतु केंद्रीय एजन्सीची परवानगी न मिळाल्याने हे काम लांबले आहे. त्यामुळे मिऱ्या किनारा सुरक्षित करण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांना यश आलेले नाही.
बसरा स्टार हे इंधनवाहू जहाज मिऱ्‍या समुद्र किनाऱ्यावर अडकून ३ जूनला २०२२ ला तीन वर्षे झाली. निसर्ग चक्रीवादळामध्ये हे जहाज भरकटून मिऱ्या किनाऱ्यावर लागले होते. दक्षिण आफ्रिकेहून ते शारजा-दुबईला निघाले होते. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते जहाज भगवती बंदरापासून काही अंतरावर नांगरून ठेवले होते; मात्र अजस्र लाटांच्या तडाख्यात नांगर तुटून हे जहाज भरकटत मिऱ्‍या समुद्रकिनारी लागले. या जहाजामध्ये १३ क्रूजर होते. मेरिटाईम बोर्ड, पोलिस, तटरक्षक दल आदींच्या मदतीने रेस्क्यू करून त्यांचा जीव वाचवण्यात यंत्रणेला यश आले. त्यानंतर प्रशासनाने त्यांच्या मध्यस्थीने कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला. मेरिटाईम बोर्डाचा युनायटेड अरब-आमिरातीच्या दूतावासाशी पत्रव्यवहार सुरू आहे. जहाज किनाऱ्यावर आदळून मोठे नुकसान झाले होते. ते काढण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. एजन्सीने खर्चाचा अंदाज घेतल्यानंतर जहाज काढण्याबाबत अनुत्सुकता दाखवली.
महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड वारंवार जहाज मालकाशी पत्रव्यवहार करत आहे; मात्र त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. भारत सरकारच्या डीजी शिपिंग कंपनीचे तांत्रिक अधिकारी (टेक्निशियन), जहाजाचे कॅप्टन, कर्मचारी आदींच्या साह्याने जहाजावरील जळके ऑईल काढण्यात आले.
इंटरनॅशनल मेरिटाईम ऑर्गनायझेशन हे जहाज काढणार असल्याचे निश्‍चित झाले आहे; मात्र त्यातही तांत्रिक अडचणी आल्याने किनारा सुरक्षेच्या दृष्टीने मेरिटाईम बोर्डाने केंद्राची सर्व ती परवानगी घेऊन जहाज भंगारात काढण्याचा निर्णय झाला. आता हे जहाज पूर्ण गंजून खराब झाले आहे.
--------------------------------
चौकट
अंतिम पाऊल उचला..
जहाज भंगारात काढण्यासाठी गोव्याच्या एजन्सीशी पत्रव्यवहार झाला होता; मात्र त्यानंतर स्थानिक पातळीवर काही लोक एकत्र येऊन त्यांनी हा ठेका घेण्याचा निर्णय झाला. स्थानिक एजन्सीकडून ते भंगारात काढण्यात येणार होते; परंतु त्यालाही केंद्राकडून तांत्रिक मंजुरी न मिळाल्याने ते कामदेखील रखडले आहे. तीन वर्षे जहाज किनाऱ्यावर खितपत पडले आहे. मिऱ्या समुद्रकिनारा सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित यंत्रणेने अंतिम पाऊल उचलण्याची मागणी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74164 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top