लांजा-लांजाला पावसाने झोडपले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लांजा-लांजाला पावसाने झोडपले
लांजा-लांजाला पावसाने झोडपले

लांजा-लांजाला पावसाने झोडपले

sakal_logo
By

-rat4p54.jpg,
33750

rat4p55.jpg
33751
- लांजा ः आंजणारी येथे मातीचा भराव व पाणी महामार्गालगतच असलेल्या दुकानात शिरले.
-------------
लांज्याला पावसाने झोडपले

मुचकुंदीला पूर; मातीचा भराव घर, दुकानात
लांजा, ता. ४ ः लांजा तालुक्याला पावसाने झोडपून काढले. विलवडे येथे मुचकुंदी नदीला आलेल्या पुराचे पाणी थेट रस्त्यावर आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. आंजणारी वरचा स्टॉप येथे मुंबई-गोवा महामार्गालगत ठेवण्यात आलेला मातीचा भराव पावसामुळे लगतच्या घर, दुकानात शिरून सामानाचे नुकसान झाले.
तालुक्यात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. तुफानी पावसाचा फटका हा आंजणारी येथील घरे व तीन दुकानांना बसला.‌ आंजणारी वरचा बस स्टॉप या ठिकाणी महामार्गाचे काम करताना मातीचा भराव महामार्गालगतच ठेवला होता. मात्र, गटार नसल्याने सोमवारी कोसळलेल्या तुफानी पावसाने हा मातीचा भराव व पाणी महामार्गालगतच असलेल्या किराणा, टेलर यांच्या दुकानांत शिरले. तसेच एका घरात शिरले. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल व पाणी शिरल्याने दुकानातील सामानाचे नुकसान झाले. प्रचंड पावसामुळे मुचकुंदी नदीला आलेल्या पुराचे पाणी थेट विलवडे रस्त्यावरून वाहू लागल्याने तालुक्यातील महत्त्वाच्या विलवडे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. या रस्त्यावरून नदीचे पाणी वाहू लागल्याने हा रस्ता काही काळासाठी ठप्प झाला होता.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74176 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..