रत्नागिरी-रिक्षाचालकाला लुबाडणाऱ्या एकाला पोलिस कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-रिक्षाचालकाला लुबाडणाऱ्या एकाला पोलिस कोठडी
रत्नागिरी-रिक्षाचालकाला लुबाडणाऱ्या एकाला पोलिस कोठडी

रत्नागिरी-रिक्षाचालकाला लुबाडणाऱ्या एकाला पोलिस कोठडी

sakal_logo
By

रिक्षाचालकाला लुबाडणाऱ्या एकाला पोलिस कोठडी

रत्नागिरी, ता. ४ : रिक्षा चालकांना प्रसादाच्या लाडूतून गुंगीचे औषध देऊन लुटणार्‍या मध्यप्रदेशमधील टोळीतील एका संशयिताला शहर पोलिसांनी गुजरात पोलिसांकडून रविवारी (ता. ४) अटक केली. त्याला न्यायालयाने ९ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत सुनावण्यात आली. त्यामुळे अन्य साथीदारांचा शोध घेण्यास पोलिसांना मदत होणार आहे. रवींद्र सिरोमन पंचम दोहरे उर्फ रवींद्र सिरोमन सिंह उर्फ रवींद्र सिरोमन पांडे (वय ३६, रा. रामपूर जि. भिंड, मध्यप्रदेश) असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. दोन रिक्षावाले बेशुद्धावस्थेत आढळल्यानंतर ही घटना उघड झाली होती. ११ जूनला सकाळी साडे नऊ वाजण्याचा सुमारास बाजारपेठेतून दोन रिक्षा व्यावसायिकांना गणपतीपुळे येथे भाडे असल्याचे सांगून एक टोळके घेऊन गेले. त्यानंतर दोन्ही रिक्षाचालकांचा संपर्क होत नसतानाच एक रिक्षाचालक दुपारी व एक रिक्षाचालक सायंकाळी परटवणे, उद्यमनगर या ठिकाणी रिक्षातच बेशुद्धावस्थेत आढळून आले. यानंतर ही घटना उघड झाली होती. काही दिवसांपूर्वी आशिष संजय किडये (रा. मांडवी, रत्नागिरी), विनेश मधुकर चौगुले (रा. कसोप, रत्नागिरी) या दोन्ही रिक्षाचालकांच्या अंगावरील सोन्याचे दागिने टोळीतील तिघांनी लांबवले होते. त्यानंतर शहर पोलिसांनी तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरवात केली होती; मात्र टोळीचा थांगपत्ता लागत नव्हता. गुजरात राज्यात अशाच प्रकारे रिक्षा व्यावसायिकांना लुटणाऱ्‍या टोळीला तेथील पोलिसांनी अटक केली होती. तेथील चोरीची पद्धत रत्नागिरीतील चोरीसारखीच होती. त्यानंतर शहर पोलिसांनी मध्यप्रदेशमधील एका तरुणाला गुजरात पोलिसांकडुन रविवारी ताब्यात घेतले. आज त्याला न्यायालयात हजर केले असता ९ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74177 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top