३ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

३

sakal_logo
By

राज्य कबड्डी संघटनेचे पाच पुरस्कार जाहीर
खेड ः राज्य कबड्डी असोसिएशनच्यावतीने कबड्डी महर्षी स्व. शंकरराव साळवी यांच्या जन्मदिनी कबड्डी क्षेत्रात योगदान देणाऱ्‍या व्यक्तींसाठी ५ पुरस्कार जाहीर झाले आहेत. शिष्यवृत्ती पुरस्कारासाठी शुभम शिंदे, उत्कृष्ट स्पर्धा आयोजक चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशन, ज्येष्ठ कार्यकर्ता सुधीर पवार, ज्येष्ठ पंच आत्माराम बैकर, ज्येष्ठ खेळाडू म्हणून विश्‍वास काटदरे यांची निवड करण्यात आली आहे. या पाच पुरस्कारांचे १५ जुलैला पदाधिकाऱ्‍यांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम पुणे येथील श्री शिवछत्रपती शिवाजी क्रीडासंकुल येथे सायं. ५ वा. होणार आहे. या प्रसंगी उपस्थित राहावे, असे आवाहन सहकार्यवाह अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74239 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top