
मधुकर कुळकर्णी यांचे निधन
rat५p४.jpg
३३८०२
- मधुकर कुळकर्णी
------------
निवृत्त बीडीओ मधुकर कुळकर्णी
यांचे मरणोत्तर नेत्रदान
रत्नागिरी, ता. ५ : तालुक्यातील धामणसे गावातील सुपुत्र आणि सेवानिवृत्त गटविकास अधिकारी मधुकर पुरुषोत्तम कुळकर्णी (वय ९१) यांचे काल (ता. ४) सोमवार वार्धक्याने निधन झाले. अण्णा कुळकर्णी या नावाने ते सर्व परिचित होते. त्यांच्या मागे पत्नी, १ मुलगा, २ मुली, सून, जावई , नातवंडे असा परिवार आहे. रत्नागिरीतील सुप्रसिद्ध डॉक्टर मिलिंद कुळकर्णी यांचे ते वडील होत.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कोकणातून खानदेशात जाऊन त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते ग्रामसेवक म्हणून शासकीय सेवेत रुजू झाले. कामाची आवड आणि शिकण्याची ओढ असल्याने खात्यांतर्गत परीक्षा देत ते बीडीओ पदापर्यंत पोहोचले. तळमळीने काम करणाऱ्या अण्णा कुळकर्णींनी शासनाच्या जनकल्याणाच्या योजना प्रभावीपणे राबवत अनेक उद्दिष्टे पूर्ण केल्याबद्दल शासनातर्फे गौरविले होते. कायद्याचे ज्ञान आणि अनुभव व प्रशासनावर असलेली पकड लक्षात घेऊन तत्कालिन पालकमंत्री भाई सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या स्थापनेनंतर त्यांना ओरसचे बीडीओ म्हणून नियुक्त केली. सिंधुदुर्गाच्या विकासात एक शासकीय अधिकारी म्हणून उत्तम सहभाग नोंदविला. रत्नागिरीचे बीडीओ म्हणूनही त्यांनी उत्तम काम केले. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आपल्या धामणसे गावाच्या विकासाकडे लक्ष दिले. गावात हायस्कूल सुरु व्हावे, यासाठी त्यांनी मेहनत घेतली. धामणसे माध्यमिक शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करत त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन हायस्कूल सुरु केले. गेले काही दिवस त्यांची प्रकृती बरी नव्हती. काल सायंकाळी ६.२० मिनिटांनी रत्नागिरी निवासस्थानी अखेरीचा श्वास घेतला. पुरोगामी विचारांच्या अण्णा कुळकर्णींनी यांनी नेत्रदान केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74299 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..