राजापूर ः पब्लिक अॅड्रेस सिस्टिम देणार धोक्याचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ः पब्लिक अॅड्रेस सिस्टिम देणार धोक्याचा इशारा
राजापूर ः पब्लिक अॅड्रेस सिस्टिम देणार धोक्याचा इशारा

राजापूर ः पब्लिक अॅड्रेस सिस्टिम देणार धोक्याचा इशारा

sakal_logo
By

rat4p29.jpg
33663
राजापूर ः शहरात अशाप्रकारेच पुराचे पाणी घुसून आणीबाणीची स्थिती निर्माण होते.
............
पब्लिक अॅड्रेस सिस्टिम देणार धोक्याचा इशारा

राजापूरवासीयांना सतर्क करणार; पाच ठिकाणी स्पीकर्स जोडणार
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ४ ः शहरातून वाहणाऱ्‍या अर्जुना आणि कोदवली नद्यांना पावसाळ्यामध्ये वारंवार पूर येऊन शहरासह परिसरातील गावांमध्ये आपत्कालिन स्थिती निर्माण होते. या आपत्कालिन स्थितीमध्ये नगरपालिकेतर्फे भोंगा वाजवून लोकांना सतर्कतेचा इशारा गेल्या कित्येक वर्षापासून दिला जात आहे. यावर्षी शहरामध्ये पाच ठिकाणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून पब्लिक अॅड्रेस सिस्टिमला जोडलेले स्पीकर्स बसवले आहेत. नगर पालिकेच्या भोंग्याच्या जोडीने हे स्पीकर्स इशारा देऊन आता राजापूरवासीयांना आपत्त्कालासह संभाव्य पूरस्थितीच्या अनुषंगाने सतर्क करणार आहेत.
शहरातील नवजीवन हायस्कूल, वरचीपेठ येथील राजीव गांधी क्रीडांगणावरील अॅक्टिव्हिटी सेंटर, समर्थनगरमधील व्यायामशाळा जवाहर चौक येथील पिकअप् शेड, नगर पालिकेचे कार्यालय अशा पाच ठिकाणी हे स्पीकर्स बसवण्यात आलेले असून, ते सद्यःस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडलेले असून येत्या काही दिवसांमध्ये नगर पालिका आपत्तकालिन व्यवस्थापन यंत्रणेशीही जोडले जाणार आहेत. या स्पीकर्सचे ऑपरेटिंग जिल्हाधिकारी कार्यालयासह नगर पालिकेकडूनही होणार असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी दिली. ही यंत्रणा मोबाईललाही जोडली जाणार असल्याचे त्याचे ऑपरेटिंग करणे अधिक सुलभ होणार आहे.
या स्पीकर्सद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयासह नगर पालिकेकडून संभाव्य पूरपरिस्थिती, अतिवृष्टी आदींबाबतचा सतर्कतेचा इशारा लोकांना दिला जाणार आहे. त्यामुळे या संभाव्य आपत्तीपासून सुरक्षितता, संरक्षण करताना पुरात होणारे संभाव्य नुकसानही टाळता येणार आहे. शहरातील व्यापारांना या स्पीकर्सच्या सतर्कतेचा अधिक फायदा होणार आहे.
----------------------------------------
चौकट
स्पीकर्सच्या माध्यमातूनही इशारा
पुराच्या पाण्याचा शहराला वेढा पडतो. शहरातील अनेक भागांमध्ये पुराचे पाणी घुसते. पुराचा हा वेढा गेल्यावेळी तीन-चार दिवस कायम राहिला आहे. त्यातून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होते. या संभाव्य आपत्कालिन स्थितीमध्ये नगर पालिका प्रशासनाकडून भोंगा वाजवून लोकांना सतर्कतेचा इशारा दिला जातो. यावर्षी या भोंग्याला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून पब्लिक अॅड्रेस सिस्टिम यंत्रणेला जोडलेले स्पीकर्सची जोड मिळणार आहे. या स्पीकर्सच्या माध्यमातूनही राजापूरकरांना आपत्कालिन सतर्कतेचा इशारा मिळणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74300 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top