कणकवली : झाड कोसळले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली : झाड कोसळले
कणकवली : झाड कोसळले

कणकवली : झाड कोसळले

sakal_logo
By

33826
सांगवे : येथील मार्गावर झाड कोसळल्‍याने ठप्प झालेली वाहतूक.

झाड कोसळल्यामुळे
सांगवेत वाहतूक ठप्प
कणकवली, ता.५ : कणकवली नरडवे रोडवर सांगवे येथे आज सकाळी अकराच्या सुमारास झाड पडल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली. नरडवे रस्त्यावर सांगवे हवामान केंद्राजवळ ही घटना घडली. काल (ता.४) देखील या रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. आज पुन्हा जवळपास तासभर नरडवे मार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्‍या होत्या. भाजप पदाधिकारी सुरेश सावंत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. त्‍यानंतर स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने बांधकाम विभागाकडून रस्त्यावरील झाड बाजूला केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74323 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top