वेंगुर्लेत १४ पासून हरिनाम सप्ताह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेंगुर्लेत १४ पासून हरिनाम सप्ताह
वेंगुर्लेत १४ पासून हरिनाम सप्ताह

वेंगुर्लेत १४ पासून हरिनाम सप्ताह

sakal_logo
By

उपवडे शाळेचे
छप्पर कोसळले
कुडाळ ः सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास उपवडे शाळेच्या इमारतीचे मंगलोरी कौलांचे छप्पर एका बाजूने कोसळले. शाळेत १ ते ७ वर्ग असून, १८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. रात्रीच्या वेळी ही घटना घडल्याने अनर्थ टळला. दोन इमारती मंगलोरी कौलारू आहेत. एक इमारत स्लॅबची आहे. तिन्ही इमारती विद्यार्थ्यांना बसण्यास धोकादायक झाल्या आहेत. याबाबत अनेकदा शिक्षण विभाग व जिल्हा परिषदेशी पत्रव्यवहार केला; मात्र याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे ही इमारत कोसळल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तलाठी एस. पी. मालवणकर यांनी पंचनामा केला. सरपंच अजित परब उपस्थित होते.
--
वेंगुर्लेत १४ पासून
हरिनाम सप्ताह
वेंगुर्ले ः वेंगुर्ले शहरातील श्री देव रामेश्वराचा अखंड हरिनाम भजनी सप्ताह १४ ते २१ जुलै या कालावधीत साजरा होणार आहे. सप्ताहाची सुरुवात १४ जुलैला सकाळी नऊला होईल. सायंकाळी निमंत्रितांची भजने होणार आहेत. श्री देव रामेश्वर व राम मंदिरात पौराणिक कथांवर आधारित विविध स्वरुपाचे देखावे सप्ताह कालावधीत साकारले जाणार आहेत. तसेच मंदिरात स्थानिक कलाकारांची रांगोळी प्रदर्शन होणार आहे. २० जुलैला रात्री बाराला दिंडी कार्यक्रम, २१ ला सकाळी दहाला रामेश्वर पालखी प्रदक्षिणा, दुपारी बाराला काल्याने सप्ताहाची सांगता होणार आहे.
-------
रेल्वे गा़ड्यांना
जादा बोगी
कणकवली ः कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या ‘अप’ व ‘डाऊन’ मिळून चार रेल्वेगाड्यांना एक दिवसासाठी जादा बोगी जोडण्यात येत आहे. ही बोगी ‘स्लिपर’ आहे. त्यानुसार ६ जुलैची हापा मडगाव (२२९०८), ८ जुलैची मडगाव-हापा (२२९०७), ५ जुलैची भावनगर-कोचुवेली (१९२६०), ७ जुलैची कोचुवेली-भावनगर (१९२५९) या गाड्या एका जादा बोगीनिशी धावणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली. सिंधुदुर्गात हापा मडगाव-हापा गाडीला कुडाळ येथे, तर कोचुवेली-भावनगर-कोचुवेली गाडीला सिंधुदुर्गनगरी येथे थांबा आहे.
------------
विद्युत वाहिन्या
एसटीवर पडल्या
वेंगुर्ले ः परुळे-भटवाडी दरम्यान विजेचा खांब उन्मळून पडल्याने वीज वाहिन्या खाली आल्या होत्या. सकाळी भोगवेहून वस्तीची गाडी कुडाळकडे जात असताना या बसवर या वीज वाहिन्या पडल्या; मात्र यावेळी वीजपुरवठा खंडित असल्याने मोठा अनर्थ टळला. या एसटी बसमधून दहा ते बारा प्रवासी प्रवास करीत होते. नंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत केला.
------------
केळुस येथे
‘महाएकादशी’
वेंगुर्ले ः केळुस-बापाडतेवाडी (ता.वेंगुर्ले) येथील विठ्ठल मंदिरात रविवारी (ता.१०) ते बुधवारी (ता १३) पर्यंत आषाढी महाएकादशी महोत्सवाचे आयोजन केले आहे. रविवारी पहाटे चारला ब्राह्मणवाडी भजन मंडळ, मोबारवाडी केळूस येथील विठ्ठल भक्तांतर्फे काकड आरती, देवतांची पूजा, अभिषेक, एकादशण्या, लघुरुद्र, नामस्मरण, विलास रेवंडकर व सहकाऱ्यांचा हरिपाठ, प्रसिद्ध कीर्तनकार प्रशांत धोंड यांचे कीर्तन, महाआरती, पुराणवाचन, संगीत विशारद प्रफुल्ल रेवंडकर व मुणगीतील सहकाऱ्यांचे गायन, विठ्ठल-रखुमाई सेवक मंडळींचे पारंपरिक भजन, रवी अणावकर व सहकाऱ्यांचे भजन, कीर्तनकार मकरंद देसाई यांचे कीर्तन, पहाटे पावणेपाचला पारंपरिक लळिताचा कार्यक्रम, ११ ला दहिहंडी गोपाळकाला आदी कार्यक्रम होणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74332 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..