ओरोस येथे इंटर बटालियन ड्रिल स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओरोस येथे इंटर बटालियन ड्रिल स्पर्धा
ओरोस येथे इंटर बटालियन ड्रिल स्पर्धा

ओरोस येथे इंटर बटालियन ड्रिल स्पर्धा

sakal_logo
By

swt५६.jpg
३३८४०
सिंधुदुर्गनगरीः इंटर बटालियन ड्रिल स्पर्धेत सहभागी स्पर्धक.

ओरोस येथे इंटर बटालियन ड्रिल स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ५ः ओरोस येथे ५८ महाराष्ट्र, बटालियन, एन. सी. सी ओरोसच्या अंतर्गत सुरू असलेल्या दहा दिवशीय शिबिरामध्ये इंटर बटालियन ड्रिल स्पर्धा झाली.
५८ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. ओरोसचे कामाडिंग ऑफिसर कर्नल दीपक दयाळ (एस.एम.) यांच्या नेतृत्वांतर्गत ही स्पर्धा झाली. थलसेना व वार्षिक ट्रेनिंग कॅम्पचे आयोजन १ ते १० जुलै या कालावधीत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ओरोस येथे करण्यात आले आहे. यामध्ये आज ड्रिल स्पर्धा घेण्यात आली. यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, कराड, सातारा, सांगली येथील बटालियनमधील १०४ कॅडेट्स सहभागी झाले होते. या कॅम्पमधील ड्रिल स्पर्धेमध्ये सुभेदार देवेंद्रकुमार, सुभेदार तुकाराम खैरनार, सुभेदार इंद्रकेश, सुभेदार तिवारी तसेच सर्व पीआय स्टाफ सहभागी होते. या ड्रिल स्पर्धेत एनसीसी अधिकारी लेफ्टनंट एस. एल. भट्टर, लेफ्टनंट बी. एल. राठोड, चीफ ऑफिसर एस. डी. कांबळे, फर्स्ट ऑफिसर रामदास कापसे हे परीक्षक होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74335 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..