कारीवणेवाडीत कातकरी मुलांना रेनकोटचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कारीवणेवाडीत कातकरी
मुलांना रेनकोटचे वाटप
कारीवणेवाडीत कातकरी मुलांना रेनकोटचे वाटप

कारीवणेवाडीत कातकरी मुलांना रेनकोटचे वाटप

sakal_logo
By

33844
मुणगे ः रेनकोट वाटपप्रसंगी उपस्थित मान्यवर, पालक व विद्यार्थी.

कारीवणेवाडीत कातकरी
मुलांना रेनकोटचे वाटप
मुणगे ः येथील यशस्विनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंद मालाडकर यांच्याकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारीवणेवाडीतील कातकरी वस्तीमधील शाळकरी विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. मालाडकर यांच्यावतीने कारिवणेवाडीतील अंगणवाडीसाठी चप्पल स्टँड आणि डिजिटल वजन काटा दिला आहे. दरम्यान, रेनकोटचे वाटप उपसरपंच धर्माजी आडकर आणि ग्रामपंचायत प्रभाग सेविकां सदस्या रविना मालाडकर यांच्या हस्ते झाले. यावेळी पंच सदस्या अंजली सावंत, माजी सरपंच सायली बागवे, प्राथमिक शिक्षक सुंदर गराटे, अंगणवाडी सेविका दिपीका बागवे आदी उपस्थित होते.
--------
33846
मुंबई ः विरोधी पक्षनेते अजित पवार यांना पुष्पगुच्छ देताना अर्चना घारे-परब.

घारेंनी घेतली पवारांची भेट
सावंतवाडी ः महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथील त्यांच्या ‘देवगिरी’ निवासस्थानी कोकण विभाग राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अर्चना घारे- परब यांनी भेट घेऊन अभिनंदन केले. यावेळी श्री. पवार यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांची, पाऊस तसेच पूर परिस्थितीची आस्थेने चौकशी केली. शेतीच्या कामांविषयी माहिती घेतली. पुढील काळात पावसाळ्यानंतर लवकरच आपण सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74343 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..