फोटोसंक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटोसंक्षिप्त
फोटोसंक्षिप्त

फोटोसंक्षिप्त

sakal_logo
By

टीपः swt59.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ - मुंबई ः विरोधी पक्षनेते अजित पवार यांना पुष्पगुच्छ देताना अर्चना घारे-परब.

अर्चना घारेंनी घेतली
अजित पवारांची भेट
सावंतवाडी, ता. 5 ः महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथील त्यांच्या ''देवगिरी'' निवासस्थानी कोकण विभाग राष्ट्रवादी महिला कॉग्रेसच्या अध्यक्षा सौ. अर्चना घारे- परब यांनी भेट घेऊन अभिनंदन केले. यावेळी श्री. पवार यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांची, पाऊस तसेच पूर परिस्थितीची आस्थेने चौकशी केली. शेतीच्या कामांविषयी माहिती घेतली. पुढील काळात पावसाळ्यानंतर लवकरच आपण सिंधुदुर्ग जिल्हा दौर्‍यावर येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
...............

टीपः swt510.jpg मध्ये फोटो आहे.
ओळ - मुणगे ः रेनकोट वाटपप्रसंगी उपस्थित मान्यवर, पालक व विद्यार्थी.

कारीवणेवाडीत कातकरी
मुलांना रेनकोटचे वाटप
मुणगे, ता. 5 ः मुणगे गावचे सुपुत्र आणि यशस्विनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंद मालाडकर यांच्याकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारीवणेवाडीतील कातकरी वस्तीमधील शाळकरी विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले.
यशस्विनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि मुणगे आडबंदरवाडीतील मुंबईस्थित सुपुत्र मालाडकर यांच्यावतीने कारिवणेवाडीतील अंगणवाडीसाठी मुलांसाठी चप्पल स्टँड आणि डिजिटल वजन काटा देणगी स्वरूपात दिला असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारिवणेवाडी शाळेतील कातकरी वस्तीमधील शाळकरी विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप उपसरपंच धर्माजी आडकर आणि ग्रामपंचायत प्रभाग सेविकां सदस्या सौ. रविना मालाडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्या सौ. अंजली सावंत, माजी सरपंच सौ. सायली बागवे, प्राथमिक शिक्षक सुंदर गराटे, अंगणवाडी सेविका सौ. दिपीका बागवे, कारिवणेवाडी ग्रामस्थ व प्रशालेचे विद्यार्थी उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्या सावंत आणि माजी सरपंच बागवे यांच्या पाठपुराव्याने कातकरी वस्तीमधील शाळकरी विद्यार्थ्यांना रेनकोट व अंगणवाडीसाठी चप्पल स्टँड व डिजिटल वजनकाटा देण्यात आला आहे. यावेळी कारिवणेवाडी ग्रामस्थ, शिक्षक, अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी श्री. मालाडकर यांचे आभार मानले.
---------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74343 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..