
गडनदी किनारी गावांना सतर्कतेच्या सुचना
फोटो येत आहे
........
rat५p१४.jpg -संगमेश्वरः गडनदी धरण तुडुंब भरले.
....
गडनदी किनारी गावांना सतर्कतेच्या सूचना
धरण पूर्ण भरले; प्रकल्प ठरतोय पर्यटकांचे आकर्षण
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ५ ः तालुक्यातील गडनदी धरण तुडुंब भरले असून नदीकिनारी असलेल्या मुरडूव, आरवली, खेरेशतसह माखजन पट्ट्यातील गावांना सावधगिरीच्या सूचना देण्यात आली आहे. गडनदी धरणातून सोमवारी (ता. ४) रात्री ८ वाजता सांडव्याद्वारे पाणी नदीपात्रात जाण्यास सुरुवात झाली, अशी माहिती गडनदी प्रकल्प कुचांबे उपविभागाचे उपविभागीय अभियंता जी. आय. इनामदार यांनी दिली.
शेतकरी वर्गाने नदीपात्रात उतरु नये व स्वतःसह जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन राजिवली ग्रामपंचायतीचे उपसरपंच संतोष येडगे यांनी यावेळी केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठा गडनदी मध्यम पाटबंधारे प्रकल्प हा येथील शेतक-यांना वरदान ठरु पाहत आहे. धरणात क्षमतापूर्ण पाणीसाठा झाला असून सांडव्याद्वारे पाणी नदीपात्रात जाण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये कुतुहालाचा विषय बनला आहे तर प्रकल्प सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.
सध्या गडनदी धरण क्षेत्रात पावसाला जोर असून ७ जुलै पर्यंत अतिवृष्टी होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. मागील २४ तासात एकूण १७१ मि.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे तर जूनपासून एकूण ९०२ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. सध्या अतिवृष्टी होत असून धरण सांडव्यावरील पाण्याचा प्रवाह प्रचंड वेगवान आहे त्यामुळे गडनदी धरण पहायला जाणा-यांनी धरणात अथवा सांडव्याच्या पाणीप्रवाहात शिरण्याचा प्रयत्न करु नये. नागरिकांनी आपली खबरदारी घ्यावी असे आवाहन उपविभागीय अभियंता जी. आय. इनामदार यांनी केले.
--------------------------------------
चौकट
उपयुक्त पाणीसाठा ६६.३८७ द.ल.घ.मी.
धरणाची संचय क्षमता १२१.१५ मीटर असून आजची पाणी पातळी १२१.३५ मीटर एवढी असून २० सेंमी उंचीने पाणी वाहत असून विसर्ग १०.५२ घ.मी./ सेकंद आहे सध्या धरणात एकूण ६६.६९९ द.ल.घ.मी. पाणीसाठा असून त्यातील उपयुक्त पाणीसाठा ६६.३८७ द.ल.घ.मी. एवढा आहे.
..
एक नजर..
मागील २४ तासात १७१ मि.मी पावसाची नोंद
जूनपासून पावसाची नोंद एकूण ९०२ मि.मी
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74358 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..