
नांदगाव परिसरातील घरांना पाण्याचा वेढा
L३३८३७
नांदगाव ः घरांच्या अंगणात भरलेले पावसाचे पाणी.
--
L३३८४१
निगुडे ः येथे घरावर झाड कोसळून नुकसान झाले.
---
L३३८४५
बांदा ः पानवळ येथे झाड हटविताना प्रशासनाचे कर्मचारी. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)
नांदगावात घरांना पाण्याचा वेढा
संततधार सुरूच; निगुडेत, पानवळेत झाडे कोसळली, वाहतुकीवर परिणाम
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. ५ ः येथे काल (ता. ४) सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने परिसराला चांगलेच झोडपले. मुंबई-गोवा महामार्गाजवळ असलेल्या घरांना महामार्गाच्या अपुऱ्या कामांचा फटका बसला असून, पाण्याने घरांना वेढल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
सलग तीन वर्षे सुरू असलेली ही जीवघेणी परिस्थिती आजही कायम असून, या समस्या का सोडविल्या जात नाहीत? असा प्रश्न बाधित ग्रामस्थांतून विचारला जात आहे. नांदगाव शाळा नंबर १ दरम्यान मोडका वहाळ येथे अर्धवट स्थितीत काम असून, या कामामुळे वहाळ पूर्णपणे मातीने बुजून गेला आहे. यामुळे जवळपास असलेल्या घरांना धोका निर्माण झाला आहे. येथील अमित मोरजकर यांच्या घराला पाण्याने वेढले असून, असाच धोका नांदगाव-मोरयेवाडी येथील बिडये कुटुंबाच्या घराला निर्माण झाला आहे. या ठिकाणीही संबंधित यंत्रणेच्या चुकांमुळे पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने पूरस्थिती उद्भवली आहे. बऱ्याच ठिकाणी असलेल्या छोट्या-मोठ्या छोट्या मोऱ्या त्याच ठिकाणी न करता एकाच ठिकाणी पाणी वळविले जात असल्याने ही समस्या निर्माण झाली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
..........
पानवळला वाहतूक ठप्प
बांदाः बांदा-दोडामार्ग राज्य मार्गावार पानवळ येथे आज सकाळी झाड कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. यावेळी वाहतूक नसल्याने मोठी दुर्घटना टळली. बांदा पोलिस निरीक्षक शामराव काळे व तलाठी वर्षा नाडकर्णी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत कर्मचाऱ्यांच्या मदतीने झाड बाजूला केले. बांदा शहर व परिसरात कालपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज सकाळी रस्त्यालगतचे झाड वादळी पावसाने रस्त्यावर कोसळले. स्थानिकांनी याची कल्पना प्रशासनाला दिली. त्यानंतर तासाभरात झाड हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले
आहे.
--
चौकट
निगुडेत घरावर झाड कोसळले
बांदा ः मुसळधार पावसाने निगुडे-तेलवाडी येथील कृष्णा नाईक यांच्या घरावर आज दुपारी झाड उन्मळून पडल्याने घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. निगुडे तलाठी भाग्यलक्ष्मी शिंदे, निगुडे सरपंच समीर गावडे, ग्रामसेविका तन्वी गवस यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. घराची कौले, लाकडी वासे यांचे सुमारे २७ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. झाड पडल्याने लगतच्या विद्युत ताराही तुटल्या. याबाबत महावितरण कंपनीला कल्पना दिल्याची माहिती निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74370 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..