मणेरीवासीयांचा उपोषणाचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मणेरीवासीयांचा उपोषणाचा इशारा
मणेरीवासीयांचा उपोषणाचा इशारा

मणेरीवासीयांचा उपोषणाचा इशारा

sakal_logo
By

मणेरीवासीयांचा उपोषणाचा इशारा
दोडामार्ग ः मणेरी गावातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करावा; अन्यथा ग्रामस्थांसह उपोषणास बसण्याचा इशारा सरपंच निशांत तळवडेकर यांनी निवेदनाद्वारे महामहावितरणचे उपअभियंता समीर नलावडे यांना दिला. निवेदनात म्हटले आहे की, मणेरीत आठ दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास होत आहे. वारंवार खंडित वीजपुरवठ्यामुळे गतवर्षी ग्रामपंचायतीच्या नळयोजनेचा मोटारपंप जळाला होता. विजेअभावी ग्रामस्थांना पाणीपुरवठा करणे अशक्य होत आहे. आठ दिवसांत गावातील वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास ग्रामस्थांसह उपोषणास बसण्याचा इशारा सरपंच तळवडेकर यांनी दिला. यावेळी समीर खानोलकर, नीलेश घुरे, राजेंद्र वस्त, सत्यवान कांबळे, भूपेश नांदोडकर, बबन सावंत, रत्नप्रभा सावंत आदी उपस्थित होते.
------------
‘बळीराजासाठी एक दिवस’
ओरोस ः विद्यार्थ्यांच्या मनात बळीराजा व शेतीबद्दल आदर निर्माण व्हावा, शेतीचे महत्त्व कळावे, श्रमप्रतिष्ठा वाढावी, शेतीची प्रत्यक्ष अनुभूती मिळावी, यासाठी जिल्हा परिषदेमार्फत ‘बळीराजासाठी एक दिवस’ हा उपक्रम राबविण्यात येतो. यंदाच्या वर्षीही जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये ७ व ८ रोजी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी, नागरिकांनी शाळेच्या संयोजनाने त्या त्या गावामध्ये आयोजित कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी केले आहे. या जिल्हास्तरीय उपक्रमाचे आयोजन शुक्रवारी (ता. ८) सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद शाळा गोळवण नं. १ (ता. मालवण) येथे केले आहे.
--------
वायंगणीत १३ ला धार्मिक विधी
आचरा ः गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त वायंगणी (ता. मालवण) येथील स्वामी समर्थ मठात १३ ला विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पहाटे पाचला मंगलस्नान दुग्धाभिषेक व पूजाविधी, सकाळी सातला नित्य आरती, ८ ते १० या वेळेत अभिषेक पारायण, १० ते ११ धार्मिक विधी, १२ वाजता महाआरती, बारा ते दीडपर्यंत महाप्रसाद, दुपारी १ ते ६ पर्यंत ‘भक्तिरंग’ कार्यक्रम होणार आहे. ‘गुरुदीक्षा’ हा कार्यक्रम सकाळी ९ ते ११ या वेळेत होणार असून, ज्या भक्तांना अन्नदान सेवेत सहभागी व्हायचे असेल, त्यांनी संपर्क साधावा.
---------------
मालवणला तेली समाज बैठक
मालवण ः मालवण तालुका तेली समाज उन्नती मंडळाच्या कार्यकारी मंडळाची त्रैमासिक बैठक शनिवारी (ता.९) दुपारी साडेतीनला पादुका मंदिर, देऊळवाडा येथे राजन आचरेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली आहे. बैठकीत दहावी, बारावी व पदवीधर विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74371 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..