
''शिक्षण पतपेढी''साठी 30 जण रिंगणात
''शिक्षण पतपेढी''साठी ३० जण रिंगणात
पंचवार्षिक निवडणूक ः २७ जणांचे अर्ज मागे
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ५ ः कुडाळ तालुका माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक चुरशीची होणार असल्याचे निश्चित झाले आहे. १५ जागांसाठी एकूण ५७ अर्ज दाखल झाले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या दिवशी यातील २७ जणांनी अर्ज मागे घेतल्याने ३० उमेदवार रिंगणात राहिले आहेत. त्यामुळे एकास एक लढत होणार आहे.
कुडाळ तालुका माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक १६ जुलैला होत आहे. संचालक म्हणून एकूण १५ व्यक्तींना निवडून द्यायचे आहे. यामध्ये खुला प्रवर्ग दहा जागा, महिला राखीव दोन जागा, इतर मागास प्रवर्ग एक, अनुसूचित जाती आणि जमाती एक तर भटक्या विमुक्त जाती जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग एक अशाप्रकारे समावेश आहे. यासाठी ५७ एवढे विक्रमी अर्ज दाखल झाले होते. त्यातील २७ जणांनी माघार घेतल्याने ३० उमेदवार रिंगणात राहिले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकृष्ण मयेकर यांनी दिली.
दहा जागांसाठी २० उमेदवार
कुडाळ तालुका माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूकीसाठी सर्वसाधारण गतातून निवडून द्यावयाच्या १० जागांसाठी ३५ अर्ज आले होते. यातील १५ अर्ज मागे घेतल्याने एकास एक असे २० उमेदवार रिंगणात आहेत. यात विजय मयेकर, संतप्रसाद परब, सतीश वारंग, प्रशांत पालव, संदीप गवाणकर, नारायण साळवी, धोंडी गावडे, गिरीश गोसावी, नारायण कोठावळे, प्रशांत चव्हाण, काशिनाथ बागेवाडी, रामचंद्र काळे, संजय गोसावी, जयवंत पेडणेकर, तकीलदार महम्मद गौस यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे चंद्रकांत चव्हाण, निखिल ओरोसकर, दीपक तारी, विश्र्वानंद पिळणकर, गिरीश राऊळ, उमेश सावंत, सुनील नाईक, विलास म्हापणकर, चंद्रकांत मोडक, सुरेश तुंबडा, अतुल बागवे, दिनेश म्हाडगुत, अनिल वारंग, नरेश परब, शिवाजी वांद्रे, सुजित गंगावणे, प्रेमादास राठोड, संतोष वारंग, शिवदस्कुमार मसगे, बापू इब्रामपुरकर या २० उमेदवारांत दुरंगी लढत होणार आहे.
पाच राखीव जागांसाठी दुरंगी लढत
पतसंस्थेच्या संचालक मंडळावर महिलांसाठी दोन राखीव जागा आहेत. यासाठी सात अर्ज आले होते. यातील साक्षी साटविलकर, माधुरी खराडे, नयना हरमलकर यांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे अंकिता मोडक, श्रद्धा कुलकर्णी, मनाली नाईक, स्नेहा परब यांच्यात दोन जागांसाठी लढत होणार आहे. इतर मागास प्रवर्ग एक जागेसाठी तीन अर्ज दाखल झाले होते. यातील गोविंद मठकर यांनी अर्ज मागे घेतल्याने विजय मयेकर व नारायण साळवी यांच्यात निवडणूक होणार आहे. अनुसूचित जाती जमाती एक जागेसाठी सहा अर्ज दाखल झाले होते. यातील चंद्रकांत चव्हाण, सुरेश तुतडा, शिवदासकुमार मसगे, आनंद कदम या चार जणांनी अर्ज मागे घेतले आहेत. परिणामी प्रशांत चव्हाण आणि विलास पालकर यांच्या या जागेसाठी थेट लढत होत आहे. तर भटक्या विमुक्त जाती जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी एका जागेसाठी सहा अर्ज आले होते. यातील विलास राठोड, चंद्रकांत पटकारे, काशिनाथ बागेवाडी आणि संजय गोसावी यांनी अर्ज मागे घेतल्याने गिरीश गोसावी व रामचंद्र काळे यांच्यात निवडणूक होत आहे.
कोट
"कुडाळ तालुका माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूकीसाठी १६ जुलैला मतदान होणार आहे. यासाठी ३७० मतदार निश्चित झाले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले आहे. ६ ला उमेदवारांची अंतिम यादी व मिळालेले निवडणूक चिन्ह प्रसिद्ध करण्यात येणार आहे."
- श्रीकृष्ण मयेकर, निवडणूक निर्णय अधिकारी
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74403 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..