आठ जागा; १७ जण रिंगणात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आठ जागा; १७ जण रिंगणात
आठ जागा; १७ जण रिंगणात

आठ जागा; १७ जण रिंगणात

sakal_logo
By

आठ जागा; १७ जण रिंगणात

जि. प. कर्मचारी पतसंस्था; १७ ला मतदान, ९ जागा बिनविरोध

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ५ ः सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या १७ जागांतील ९ जागा बिनविरोध झाल्या असून आठ जागांसाठी १७ जुलैला मतदान होणार आहे. या आठ जागांसाठी १७ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाच्या कार्यालयीन अधीक्षक तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती यू. यू. यादव यांनी ही माहिती दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक १७ जुलैला होत आहे. यासाठी ८६० मतदार निश्चित झाले आहेत. या पतसंस्थेचे एकूण १७ संचालक निवडून द्यायचे आहेत. यामध्ये आठ तालुक्यांतून आठ व जिल्हा मुख्यालयातून चार असे एकूण बारा संचालक सर्वसाधारणमधून निवडून द्यायचे आहेत. महिला राखीव, अनुसूचित जाती जमाती एक, इतर मागास प्रवर्ग एक आणि भटक्या विमुक्त जाती जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग एक अशाप्रकारे प्रतिनिधी निवडून द्यायचे आहेत. या १७ संचालक पदासाठी एकूण ३३ अर्ज दाखल झाले होते. यातील सर्वसाधारण १२ जागेतील सात जागा बिनविरोध झाल्या आहेत. अनुसूचित जाती जमाती, इतर मागास प्रवर्ग या दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आठ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले असून उद्या (ता.६) अंतिम उमेदवार यादी आणि निवडणूक चिन्ह प्रसिद्ध केले जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती यादव यांनी दिली.

नऊ उमेदवार बिनविरोध
सर्वसाधारण मतदारसंघ असलेल्या बारा पैकी सात जागा बिनविरोध झाल्या आहेत. यातील तालुका मतदार संघातील दोडामार्ग तालुक्यातून शुभम मुळीक, कुडाळ मधून विनोद राणे, सावंतवाडी मधून एकनाथ सावंत, कणकवली मधून निलेश मयेकर, मालवण मधून संतान फर्नांडिस, वैभववाडी मधून विशाल चौगुले या जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर जिल्हा मतदार संघ असलेल्या इतर मागास प्रवर्ग मधून सुनील बाणे आणि अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून आनंद चव्हाण बिनविरोध निवडून आले आहेत.
-------------
चौकट
आठ जागांसाठी मतदान
वेंगुर्ले तालुका संचालक पदाची जागा बिनविरोध झालेली नाही. एका जागेसाठी मुतुल सातार्डेकर, सूरज देसाई आणि अर्जुन नाईक हे तीन उमेदवार रिंगणात राहिले आहेत. जिल्हा मुख्यालय मतदार संघातून चार संचालक निवडून द्यायचे आहेत. यासाठी शोभराज शेर्लेकर, संतोष परब, राजेश नाईक, श्रीकृष्ण मुळीक, संजीव गोगटे, न्हानु दळवी, अमित तेंडोलकर, योगेश तावडे हे आठ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. तर दोन महिला राखीव जागांसाठी मधुबाला फाले, गीतांजली वालावलकर, शमिका घाडीगांवकर, समिधा ठाकूर हे चार उमेदवार रिंगणात आहेत. भटक्या विमुक्त जाती जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग या जागेसाठी लक्ष्मण डोईफोडे आणि विठ्ठल मालंडकर यांच्यात निवडणूक होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74411 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..