सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण
सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

sakal_logo
By

सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण
चिपळूणः राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे पंधरागाव धामणंद येथे वृक्षारोपण करण्यात आले. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. २२ जुलैला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस आहे. यानिमित्तही वृक्षारोपण केले जाणार आहे. त्याची तयारी सुरू झाली आहे. सुमारे एक हजार रोपांची लागवड केली जाणार आहे. या वेळी अंजली पालांडे, आश्रया सुर्वे, पंक्ती पालांडे, माधवी शिंदे, पूर्वा पातकर, मयुरी भोसले, गीता चव्हाण, अश्विनी सुर्वे आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
................
सावर्डे येथे कृषिदिन
चिपळूणः कला व वाणिज्य महाविद्यालय सावर्डे येथे कृषिदिन साजरा करण्यात आला. महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या कर्तृत्वाला उजाळा देण्यासाठी महाविद्यालयामध्ये कृषिदिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला प्राध्यापक हरिचंद्र भागडे हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते. या वेळी प्रा. भागडे म्हणाले की, भारत हा कृषिप्रधान देश असून, ते जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे अग्रेसर राष्ट्र आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून शेतीकडे पाहिले जाते. शेतीकडे फक्त उदरनिर्वाहाचे साधन म्हणून न बघता तिच्याकडे मानवी समृद्धशील जीवनाचा एक उत्तम व्यवसाय म्हणून तिच्याकडे बघितले पाहिजे. कोरोना महामारीच्या काळामध्ये शेतीचे महत्व सर्वांना कळाले. नव्याने शेतीविषयक ज्ञानाला सुरवात करून आपण नियोजनपूर्ण शेती केली तर आपले जीवनमान उंचावू शकते आणि आपल्या पर्यावरणाचाही समतोल टिकू शकतो.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74416 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top