जहांगीर कलादालनात मान्सून प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जहांगीर कलादालनात मान्सून प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांची निवड
जहांगीर कलादालनात मान्सून प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांची निवड

जहांगीर कलादालनात मान्सून प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांची निवड

sakal_logo
By

rat५p२७.jpg ः
33877
जहांगीर कलादालनात प्रदर्शनासाठी निवड झालेली विद्यार्थ्यांची चित्रे.

जहांगीर कलादालनात प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांची निवड
---
सह्याद्री आर्ट स्कूलचे यश; ४२ व्या ‘मॉन्सून शो’त झळकणार
संगमेश्वर, ता. ५ ः जहांगीर कलादालनात ४२ व्या ‘मॉन्सून शो’साठी कोकणातील अग्रगण्य सह्याद्री स्कूल ऑफ सावर्डे या चित्र-शिल्पकला महाविद्यालयातील ऋतिक शिरकर, संकेत कदम, साक्षी मोरे, श्रीनाथ मांडवकर, तुषार पांचाळ या पाच विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
देशातील नामवंत जहांगीर कलादालनाची स्थापना १९५२ मध्ये झाली असून, आज ७० वर्षांनीही हे कलादालन नवोदित कलाविद्यार्थ्यांना जगासमोर प्रदर्शित करण्याची परंपरा अविरतपणे करीत आहे. यासाठी हे कलादालन अनेक उपक्रम राबवत असते. दरवर्षी या ठिकाणी मॉन्सून प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. यात संपूर्ण महाराष्ट्रातील कलामहाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी होतात. यातून काही निवडक विद्यार्थी यात निवडून त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन करण्यात येते. ही त्या विद्यार्थ्यांसाठी व कला महाविद्यालयासाठी अभिमानाची गोष्ट असते. या वर्षी घेण्यात आलेल्या ४२ व्या ‘मॉन्सून शो’साठी पाच विद्यार्थ्यांची निवड ही सह्याद्री स्कूल ऑफ सावर्डे या चित्र-शिल्प कला महाविद्यालयाला अभिमानास्पद बाब आहे.
विद्यार्थी आपल्या या यशाचे श्रेय कला महाविद्यालयास देत आहेत. सह्याद्री कला महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव, प्रा. रूपेश सुर्वे, अमित सुर्वे, प्रदीपकुमार देडगे, अवधूत खातू, विक्रांत बोथरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे संकेत कदम याने सांगितले.

चौकट
असंख्य कलारसिकांसमोर जाणार
जहांगीर कलादालनात आम्हाला आमची कला प्रदर्शित करण्याची संधी मिळणे, ही बाब आमच्यासाठी अत्यंत प्रेरणादायी असून, यामुळे आमची कला असंख्य कलारसिकांसमोर जाणार आहे. सह्याद्री कला महाविद्यालयात कलाविषयक जे विविध उपक्रम होतात, त्यातून आम्हाला नवनवीन कल्पना सुचतात आणि सुप्त कलेला अधिक वाव मिळतो, असे मत ‘जहांगीर’मधील कलाप्रदर्शनासाठी कलाकृतीची निवड झालेल्या श्रीनाथ मांडवकर याने व्यक्त केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74417 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top