- rat0520 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

- rat0520
- rat0520

- rat0520

sakal_logo
By

rat5p5.jpg
33803
रत्नागिरीः ‘कोमसाप’ रत्नागिरी शाखेची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. शाखेच्या अध्यक्षपदी तेजा मुळ्ये; सचिवपदी सुनील चव्हाण. सोबत अन्य मान्यवर.
..........
‘कोमसाप’ रत्नागिरी शाखा
अध्यक्षपदी तेजा मुळ्ये
रत्नागिरी, ता. ५ : कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप), रत्नागिरी शाखेच्या अध्यक्षपदी सौ. तेजा रवींद्र मुळ्ये यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. शाखेची बैठक कवी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष तथा केंद्रीय निरीक्षक गजानन तथा आबा पाटील, केंद्रीय सचिव माधव अंकलगे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत रत्नागिरी शाखेची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली.
शाखेच्या कार्याध्यक्षपदी चंद्रमोहन देसाई यांची, तर उपाध्यक्षपदी राजेंद्र शंकर कदम, सचिवपदी सुनील एकनाथ चव्हाण, हुसेन कादर पठाण सहसचिवपदी, खजिनदारपदी विद्याधर लक्ष्मण कांबळे, संजय बाळकृष्ण कुळये सह कोषाध्यक्ष म्हणून निवड केली. जिल्हा प्रतिनिधी म्हणून आनंद शेलार यांची निवड झाली. आकांक्षा आनंद भुर्के महिला प्रमुख, दुर्गेश आखाडे यांची युवा प्रमुख म्हणून निवड केली आहे. कार्यकारिणी सदस्यपदी आकांक्षा निगुडकर, मनोजकुमार खानविलकर, राजेंद्र चव्हाण, विजय साळवी यांची निवड केली. रत्नागिरी शाखेच्या सल्लागारपदी सुभाष भडभडे, प्रमोद कोनकर, राजेंद्रप्रसाद मसुरकर, गणेश गुळवणी, सुनेत्रा जोशी, डॉ. दिलीप पाखरे यांची निवड केली असून नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74421 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top