केळुस येथे ‘महाएकादशी’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केळुस येथे ‘महाएकादशी’
केळुस येथे ‘महाएकादशी’

केळुस येथे ‘महाएकादशी’

sakal_logo
By

केळुस येथे ‘महाएकादशी’
वेंगुर्ले ः केळुस-बापाडतेवाडी (ता. वेंगुर्ले) येथील विठ्ठल मंदिरात रविवारी (ता. १०) ते बुधवारी (ता १३) पर्यंत आषाढी महाएकादशी महोत्सवाचे आयोजन केले आहे. रविवारी पहाटे चारला ब्राह्मणवाडी भजन मंडळ, मोबारवाडी केळूस येथील विठ्ठलभक्तांतर्फे काकड आरती, देवतांची पूजा, अभिषेक, एकादशण्या, लघुरुद्र, नामस्मरण, विलास रेवंडकर व सहकाऱ्यांचा हरिपाठ, प्रसिद्ध कीर्तनकार प्रशांत धोंड यांचे कीर्तन, महाआरती, पुराणवाचन, संगीत विशारद प्रफुल्ल रेवंडकर व मुणगीतील सहकाऱ्यांचे गायन, विठ्ठल-रखुमाई सेवक मंडळींचे पारंपरिक भजन, रवी अणावकर व सहकाऱ्यांचे भजन, कीर्तनकार मकरंद देसाई यांचे कीर्तन, पहाटे पावणेपाचला पारंपरिक लळिताचा कार्यक्रम, ११ ला दहिहंडी गोपाळकाला आदी कार्यक्रम होणार आहेत.
---
विद्युत वाहिन्या एसटीवर
वेंगुर्ले ः परुळे-भटवाडीदरम्यान विजेचा खांब उन्मळून पडल्याने वीज वाहिन्या खाली आल्या होत्या. सकाळी भोगवेहून वस्तीची गाडी कुडाळकडे जात असताना या बसवर या वीज वाहिन्या पडल्या; मात्र यावेळी वीजपुरवठा खंडित असल्याने मोठा अनर्थ टळला. या एसटी बसमधून दहा ते बारा प्रवासी प्रवास करीत होते. नंतर ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत केला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74427 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top