रात्रीत तीन मंदिरांवर डल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रात्रीत तीन मंदिरांवर डल्ला
रात्रीत तीन मंदिरांवर डल्ला

रात्रीत तीन मंदिरांवर डल्ला

sakal_logo
By

33915
अरुळे ः बोर्चादेवी मंदिरातील फंडपेटी चोरट्यांनी फोडून ती काजूच्या बागेत नेऊन ठेवली.


रात्रीत तीन मंदिरांवर डल्ला

वैभववाडी तालुक्यातील प्रकार; अरुळे, सडुरे, कुर्लीतील फंडपेट्या फोडल्या

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ५ ः तालुक्यातील अरुळे, सडुरे आणि कुर्ली येथील तीन मंदिरातील फंडपेट्या काल (ता. ४) रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातील अंदाजे दहा हजाराची रक्कम पळविली. चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढल्यामुळे तालुक्यात खळबळ माजली आहे. या प्रकारानंतर पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.
अरुळे येथील बोर्चादेवी मंदिराचे पुजारी दशरथ गुरव हे आज सकाळी शेतीच्या कामासाठी मंदिरानजीक असलेल्या वाटेवरून जात होते. यावेळी त्यांना मंदिराचा दरवाजा उघडा दिसला. त्यामुळे त्यांनी मंदिरात जाऊन पाहिले असता त्यांना फंडपेटी दिसून आली नाही. त्यांनी ही माहिती मंदिराचे मानकरी गणपत रावराणे यांना दिली. त्यानंतर त्या दोघांनी आजूबाजूला शोध घेतला असता त्यांना श्री. गुरव यांच्या काजूबागेत मदिरांपासून २०० फूट अतंरावर पेटी आढळून आली. या चोरीची माहिती त्यांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलिस निरीक्षक अमित यादव, पोलिस नाईक मारुती साखरे, पोलिस कर्मचारी राहुल पवार, अभिजीत तावडे, श्री. जायभाय आदी घटनास्थळी पोहोचले. बोर्चादेवी मंदिरातील चोरीची माहिती घेत असताना पोलिसांना सडुरे येथील रवळनाथ आणि कुर्ली येथील कुर्ला देवी मंदिरांतील फंडपेटी फोडल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तिन्ही मंदिरात जाऊन पाहणी केली. तिन्ही मंदिरातील फंडपेट्या मंदिरापासून काही अतंरावर नेऊन ठेवल्याचे निदर्शनास आले. चोरीची पद्धत समान असल्यामुळे यामागे एकाच टोळीचा हात असल्याचा संशय आहे. बोर्चादेवी मंदिरातील अंदाजे दीड हजार रुपये, रवळनाथ मंदिरातील अंदाजे आठ हजार रुपये आणि कुर्ला देवी मंदिरातील अंदाजे १ हजार रुपये चोरीस गेल्याचा अंदाज पुरोहितांनी वर्तविला.
---
स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण
एकाच रात्रीत तीन गावातील मंदिरे चोरट्यांनी फोडल्यामुळे खोऱ्यातील गावांसह तालुक्यात खळबळ माजली आहे. पुन्हा एकदा चोरट्यांनी डोके वर काढल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, मंदिर व्यवस्थापनाने मंदिरातील फंडपेटीतील रक्कम नियमित काढावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74463 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..