
माणगाव खोऱ्यात मुसळधार
33935
माणगाव ः आंबेरी पुलावर वाहून आलेली झाडे जेसीबीच्या सहाय्याने काढताना संबंधित यंत्रणा.
माणगाव खोऱ्यात मुसळधार
माणगाव ः माणगाव खोऱ्यात गेले दोन-तीन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे खोऱ्यातील सर्व नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. मंगळवारी दुपारी माणगाव-आंबेरी पुलावर पाणी येऊन दोन तास वाहतूक खोळंबली. पावसाच्या पाण्याबरोबर वाहून आलेली झाडे जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करण्यात आली. माणगाव खोऱ्यातील अनेक गावे पुलामुळे जोडली गेली आहेत. दरवर्षी पावसाळ्यात पूल पाण्याखाली जात असल्याने वाहतूक ठप्प होते. यावर्षी पर्यायी आंबेरी पुलाचे काम हाती घेतले आहे; मात्र सध्या ते बंद असल्याने यावर्षीही पावसाळ्यात वाहतूक खोळंबून ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागणार आहे.
................
कोरोनाचे आणखी चार रुग्ण
ओरोस ः जिल्ह्यात आज कोरोनाचे चार रुग्ण आढळले. दहा रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. परिणामी आज ७५ रुग्ण सक्रिय आहेत. आज मिळालेल्या रुग्णांत कणकवली २, तर सावंतवाडी व वेंगुर्लेतील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. आज एकूण १७२ नमुने तपासण्यात आले. एकूण रुग्ण संख्या ५७ हजार ६४० झाली आहे, तर सक्रिय रुग्ण ७५ असून, यात देवगड ६, दोडामार्ग ६, कणकवली ५, कुडाळ २०, मालवण ४, सावंतवाडी १४, वैभववाडी १, तर वेंगुर्ले १९ अशाप्रकारे तालुकानिहाय समावेश आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74464 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..