राजापुरात सलग दुसऱ्या दिवशीही पूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापुरात सलग दुसऱ्या दिवशीही पूर
राजापुरात सलग दुसऱ्या दिवशीही पूर

राजापुरात सलग दुसऱ्या दिवशीही पूर

sakal_logo
By

rat5p40.jpg-
L33944
राजापूर ः पाण्याखाली गेलेले मुन्शी नाका परिसर.
...
rat5p39.jpg -
L33943
राजापूर ः पाण्याखाली असलेला जवाहरचौक परिसर
...
राजापुरात दुसऱ्या दिवशीही पूर

जनजीवन विस्कळीत; ग्रामीण भागावरही परिणाम, बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल थंडावली
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ५ ः सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अर्जुना-कोदवली नद्यांना आलेल्या पूराच्या पाण्याच्या वेढ्यातून सुमारे सात तासानंतर सुटका झालेल्या राजापूर शहराला आज दुपारी पुन्हा सलग दुसऱ्‍या दिवशी पुराचा वेढा पडला. शिवाजीपथ रस्त्यासह वरचीपेठ, मुन्शी नाका परिसर पाण्याखाली गेला असून जवाहरचौकामध्ये सुमारे दीड-दोनफुट उंच पाणी होते. दिवसभर पाऊस सुरू असल्याने पूराचा वेढा सायंकाळी उशिरापर्यंत कायम होता. यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले तर, बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल रोडावली आहे.
अर्जुना-कोदवली नद्यांना काल दुपारी पूर येवून पाणी शहरामध्ये घुसले होते. पावसाचा जोर कमी झाल्याने रात्री उशिरा सुमारे सात तासाच्या कालावधीनंतर जवाहर चौकातील पूराचे पाणी ओसरले होते. त्यामुळे काल विस्कळीत झालेले जनजीवन आज पूर्वपदावर आले होते. मात्र, सकाळी पुन्हा एकदा पावसाने जोर धरल्याने दुपारी पुन्हा पुराच्या पाण्याने शहराला वेढा घातला. पाण्याने जवाहरचौकामध्ये थेट धडक देत, सायंकाळी उशिरापर्यंत ठिय्या मांडला होता. पावसाचा जोर कायम असल्याने पाणी तासागणिक वाढत होते.
...
चौकट
भातशेतीसह रस्ते पाण्याखाली
मंगळवारी शहरातील बहुतांश भाग पाण्याखाली गेला होता. जवाहरचौक, वरचीपेठ, मुन्शी नाका, बंदरधक्का परिसर, शिवाजी पथ रस्ता येथे पाणी होते. जवाहरचौकातील टपऱ्‍यांसह शिवाजी पथ रस्त्यावरील टपऱ्‍यांमध्ये पूराचे पाणी घुसल्याने दुपारपासून या टपऱ्‍या बंद होत्या. शहराप्रमाणे ग्रामीण भागातही पूराचे पाणी घुसले. नद्यांच्या काठावरील भातशेतीसह रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
-----------------------------------------------------
चौकट
घर गाठण्यासाठी १० कि.मी.चा वळसा
शहरानजीकच्या शीळ-गोठणेदोनिवडे-चिखलगाव रस्ता गेल्या दोन दिवसांपासून पाण्याखाली राहिला आहे. त्यामुळे या परिसरातील लोकांना सुमारे दहा-बारा कि. मी. चा वळसा मारून घर गाठावे लागत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y74467 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..